Nashik Monsoon Rain Update : पालखेड पाठोपाठ पुणेगांव धरण 80 टक्के भरले; धरणातून विसर्ग सुरु

Monsoon Rain Update : पुणेगांव धरण ८० टक्के भरलल्याने धरणाच्या तीन मोऱ्यातीन ३०० क्युसेक वेगाने उनंदा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात सुरुवात करण्यात आली असून यापेक्षा अधिक वेगाने पाणी रात्री उशिरा वाढविण्यात येणार आहे.
Punegaon Dam
Punegaon Damesakal
Updated on

वणी : दिंडोरी तालुक्यातील ओझखेड व पुणेगांव धरण क्षेत्रात दोन तीन दिवसा पासुन पडत असलेल्यां पावसामुळे नदी नाल्यांना पुर आल्याने पाण्याची आवक वाढुन धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. पुणेगांव धरण ८० टक्के भरलल्याने धरणाच्या तीन मोऱ्यातीन ३०० क्युसेक वेगाने उनंदा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात सुरुवात करण्यात आली असून यापेक्षा अधिक वेगाने पाणी रात्री उशिरा वाढविण्यात येणार आहे. दरम्यान उनंदा काठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Monsoon Rain Update After Palkhed Punegaon Dam 80 percent full)

ओझरखेड धरण क्षेत्रात पडल असलेल्या पावसाने सायं पाच वाजेपर्यंत १२.७७ टक्के जलसाठा झाला आहे. ता २ ऑगस्टपर्यंत उपयुक्त साठा शुन्य होता. ता.४ ऑगस्ट रोजी सांयकाळी पाच वाजेपर्यंत १२.७७ टक्के झाल्याची माहिती शाखा अभियंता भुषण कुवर (जल संपदा विभाग ओझरखेड प्रकल्प) यांनी दिली.

तसेच पुणेगांव धरणात जलसाठा वाढला असून तेथील विसर्ग ३०० क्युसेकनी सुरू करण्यात आला आहे. ओझरखेड धरणातील जलसाठ्यात वाढ होईल पुर्ण क्षमतेने भरण्यास मदत होईल. पुणेगांव धरण क्षेत्राच्या परिसरात पाऊस पडत असल्याने ८० टक्के जलसाठा वाढला आहे. सुरू असलेल्या पावसामुळे भरले आहे. (latest marathi news)

Punegaon Dam
डिंभे धरणाच्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना इशारा

तसेच मांजरपाडा प्रकल्पातून २५ द.ल.घ.फु पाणी येत असुन झपाट्याने जलसाठ्यात वाढ होत आहे. पाण्याचा विसर्ग सुरू केला असुन जवळपासच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. अशी माहिती शाखा अभियंता विक्रम डावरे (जल संपदा विभाग पुणेगांव प्रकल्प) यांनी दिली.

पुणेगांव धरणातील ३०० क्युसेस पाण्याचा विसर्ग व ओझरखेड धरण परिसरात सुरू असलेल्या पावसाचे प्रमाण असे असल्यास ओझरखेड धरणातील जलसाठा वाढत राहील व येत्या आठवडय़ात पुर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता वर्तविण्यात आली. वणी व परीसरात समाधानकारक पाऊस सुरू आहे. देवनदी लेंडीनाला तसेच परिसरातील ओहोळ ओसंडून वाहत आहेत. सायंकाळपर्यंत पाऊस संततधार सुरूच आहे.

Punegaon Dam
चार तासांतच पुण्याला झोडपले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.