Nashik Monsoon Rain Update : दिवसभर ढगाळ वातावरण अन तुरळक सरी! पावसाची उसंत; गंगापूरचा साठा 46.14 टक्क्यांवर

Monsoon Rain Update : नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात दोन महिने उलटूनही पावसाचा जोर नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे तर धरणक्षेत्रात पाऊस नसल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे.
gangapur dam file photo
gangapur dam file photoesakal
Updated on

Nashik News : उत्तर महाराष्ट्र वगळता राज्यात पावसाची धुवांधार बॅटिंग सुरू आहे. मुंबई, पुण्यात तर पावसाने कहर केला आहे. मात्र, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात दोन महिने उलटूनही पावसाचा जोर नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे तर धरणक्षेत्रात पाऊस नसल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे. (Nashik Monsoon Rain Update Cloudy all day)

गेल्या रविवारी (ता. २१) पासून तीन-चार दिवस पावसाची रिपरिप तर मध्येच जोरदार सरी कोसळत असल्याने नाशिक परिसरात समाधान व्यक्त होत होते. परंतु शुक्रवारपासून पुन्हा पावसाने दडी मारली आहे. यामुळे नाशिककरांच्या चिंतेत भर पडली आहे.

शनिवारी (ता. २७) दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. तर, धरणक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी परिसरातही पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसात गंगापूर धरणसाठ्यात जी वाढ झाली त्यात भर पडलेली नाही. (latest marathi news)

gangapur dam file photo
Nandurbar Monsoon Rain : वरुणराजाच्या कृपेने बळीराजा खूश..! समाधानकारक पावसाने पिके तरारली; शेतीकामांना वेग

आजमितीस धरणात ४६.१४ टक्के इतकाच साठा आहे. एव्हाना दरवर्षी जुलैअखेरपर्यंत धरणात ७० टक्के जलसाठा असतो तर ऑगस्टअखेरपर्यंत धरणात क्षमतेने भरते. यंदा मात्र पावसाने मारलेल्या दडीमुळे नाशिकसह नगर आणि मराठवाड्याच्या चिंतेत भर पडली आहे.

gangapur dam file photo
Nashik Monsoon Rain Update : भोजापुर धरणात 2 दिवसांत पस्तीस टक्के पाणीसाठा जमा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.