Nashik Monsoon Red Alert : श्रावणात रिमझिम पावसाची सवय झालेली असताना यंदा मात्र उलटा अनुभव नागरिकांना येत आहे. पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने श्रावण कोसळधार म्हणण्याची वेळ आली आहे. दरम्यान, हवामान विभागाने जिल्ह्याला शनिवारी (ता. २३) ‘रेड अलर्ट’ जारी केल्याने पावसाचा वेग अधिक वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी (ता. २३) नाशिक जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला होता. (monsoon Red Alert today in district )