Nashik Monsoon Tourism: पावसाची उघडीप, पर्यटनस्थळे गजबजली! हुल्लडबाजांवर पोलिसांची नजर

Vishramgad, Kheervire Ghat, Kurundwadi Falls
Vishramgad, Kheervire Ghat, Kurundwadi Fallsesakal
Updated on

Nashik Monsoon Tourism : पावसाळा सुरू झाला, की सह्याद्रीच्या मुख्य रांगेशिवाय अन्य भागातील गडदुर्गावर नजर टाकता हिरवाईने नटलेले हे गडकोट वेगळ्याच जगात घेऊन जातात.

अकोले आणि सिन्नर तालुक्याच्या विश्रामगडाची भ्रमंतीही अशीच. त्यामुळे पर्यटकांना ते खुणावते. (Nashik Monsoon Tourism Open to rain tourist places crowded Police keep eye on hooligans)

सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या व अकोले तालुक्यातील विश्रामगड, खीरविरे घाट, कुरुंदवाडी परिसरातील धबधबे पर्यटकांच्या गर्दीने गजबजले आहे.

पावसाचा जोर मंदावल्याने पर्यटनाला बहर आला. क्षणात ऊन, क्षणात पाऊस, गार वारा आणि धुक्याच्या दुलईचा आनंद घेण्यासाठी तरुणाई पर्यटनस्थळांकडे धाव घेत होती.

यंदा पावसाला विलंब झाला तरी जुलैमध्ये अकोले, तसेच इगतपुरी तालुक्यात पाऊस झाल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, धबधबेही पूर्णक्षमतेने प्रवाहित झाले आहेत.

मुसळधार पावसामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीही जिल्ह्यातील धबधब्यांवर प्रवेशाला निर्बंध घातले. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याने पर्यटनाला बहर आला आहे. शनिवारी मोहरमनिमित्त सुटी आणि जोडून आलेल्या रविवारच्या सुटीमुळे

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Vishramgad, Kheervire Ghat, Kurundwadi Falls
Monsoon Tourism: काय तो वणीचा डोंगर, काय ते धबधबे, काय ती झाडी! गडावरील निसर्गसौंदर्याची तरुणाईला भुरळ

अनेकांनी विविध पर्यटनस्थळांवर जाण्याचे नियोजन केली होती. काही पर्यटकांची विश्रामगड, खीरविरे घाट, कुरुंदवाडी धबधब्याला पसंती होती. निसर्गाचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी काहीजण कुटुंबासह गेले होते.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या पश्चिमेला आणि नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यावर निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली आहे.

अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगडापासून सुरू झालेली ही उधळण पाबर, रतनगड, भंडारदरा, कळसूबाई, बितिंगा ते औंढा येथे विसावते.

धबधब्याचा आनंद आता लांबूनच घेतला जात आहे. पर्यटकांच्या हुल्लडबाजीवर पोलिसांची नजर आहे. वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी दर रविवारी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते. विश्रामगडावर जाताना मार्गावर पर्यटकांची गर्दी लक्ष वेधून घेत होती.

ढग्या डोंगरावर नागरिकांची रेलचेल

सिन्नर शहरातील ढग्या डोंगरावर व ठाणगाव परिसरातील अनेक ठिकाणी नागरिकांनी रविवारी निसर्गाचा आनंद लुटला. नागरिक आपल्या कुटुंबासह निसर्गाचा आनंद घेत होते. हिरवाईने नटलेला ढग्या डोंगर, ठाणगाव, डुबेरे येथेही नागरिकांची गर्दी होती.

Vishramgad, Kheervire Ghat, Kurundwadi Falls
Monsoon Tourism: शहरात पर्यटकांची मांदियाळी..! बसस्‍थानकावर गर्दी, धार्मिक-निसर्ग पर्यटनाला चालना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.