Nashik Monsoon Tourism: वर्षासहलीसाठी पहिने बारी गजबजली! 15 हजारांवर पर्यटक त्र्यंबकनगरीत सहलीला

वीकेंडच्या पर्यटनातून वन विभागाला ७० हजार रुपयांचे उत्पन्न
Tourists throng to enjoy themselves in the water of the waterfall at Pahne Bari. Waterfalls flowing from the hills of Brahmagiri enthrall the tourists with a panoramic view of nature.
Tourists throng to enjoy themselves in the water of the waterfall at Pahne Bari. Waterfalls flowing from the hills of Brahmagiri enthrall the tourists with a panoramic view of nature.esakal
Updated on

Nashik Monsoon Tourism : नाशिक जिल्ह्याचे नव्हे तर उत्तर महाराष्ट्राचे काश्मीर असलेल्या त्र्यंबकेश्वर परिसराला वर्षासहलीसाठी पर्यटकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे.

३५ हजारांहून अधिकचे पर्यटक रविवारी (ता. १६) त्र्यंबकेश्वर भागात वर्षासहलीसाठी आले होते. सर्वांत जास्त गर्दी पहिने बारीमध्ये होती. (Nashik Monsoon Tourism pahine bari buzzing for rainy season 15000 tourists for trip to Trimbakeshwar)

त्र्यंबकेश्वर-घोटी रोड या भागात पेगलवाडी नजीक पहिने बारी आहे. उंच उंच डोंगर दऱ्या, कोसळणारे धबधबे, जोरदार हवा, वैतरणा नदीला आलेले पाणी, डोंगररांगावर दाटणारे ढग, मधूनच डोंगराला अदृश्य करणारे धुके सर्व परिसर हिरवळीने सजला आहे.

त्यात जोरात पाऊस होता. पावसाच्या जोरदार सरी, तर कधी उघडिपीमुळे वातावरण आल्हाददायक झाले होते.

पर्यटकांमध्ये तरुण-तरुणींचा उत्साह दांडगा होता. कुटुंबवत्सल पर्यटकही होते. कुणी पाण्यात उतरले होते, तर कोणी धबधब्याच्या नजीक होते. अंजनेरी धरण, अंजनेरी गड ,ब्रह्मगिरी गंगाद्वार, आंबोली धरण या भागातही पर्यटक तुरळक संख्येने होते.

दुगारा धबधबा अद्याप जोरात नसला तरी पर्यटकांची हजरी होती. दुचाकीसह चारचाकी वाहनांची मोठी गर्दी होती. परिसरातील ढाबे, हॉटेल्स यांना सुगीचे दिवस आले होते. गरम शेंगा, मका कणीस यांना मागणी होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Tourists throng to enjoy themselves in the water of the waterfall at Pahne Bari. Waterfalls flowing from the hills of Brahmagiri enthrall the tourists with a panoramic view of nature.
Monsoon Tourism : प्राचीन काळापासून सात देवतांचं निवासस्थान असलेलं विदर्भातलं हे ठिकाण, एकदा नक्की बघा

पोलिस यंत्रणा सतर्क

त्र्यंबकेश्वर पोलिसांनी पेगलवाडी येथे चेकिंग पॉइंट लावला होता. बारीकडे जाणाऱ्या पर्यटकांची झडती व चौकशी होत होती. गतवर्षी पहिने नदीत दोन गटांत हाणामारी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे बंदोबस्त होता.

‘हसा खेळा पण शिस्त पाळा, निसर्गाचे जतन करा. निसर्गात जाऊन फोटो काढला जात होते. अशाप्रकारे वर्षा सहल होती.

त्र्यंबकेश्वरचा अहिल्या धरण परिसरही गजबजला होता. त्र्यंबकेश्वरची पंचक्रोशी पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध होऊ लागली आहे. तोरणांचा धबधबा नाच लोंधी धबधबा प्रसिद्ध होत आहे.

गौतम तलावावर भाविक पर्यटकांची गर्दी असते. या ठिकाणी माशांना पाव टाकणे, पोळी टाकणे यासाठी पर्यटक गर्दी करतात. काही मंडळी तलावाच्या कठड्यावर उभे राहतात.

या ठिकाणी जाळ्या नसल्याने पालिका यंत्रणांनी लक्ष घालावे व त्वरित जाळ्या बसवाव्यात. तलावाच्या काही भागात सुशोभीकरण झाले आहे.

पहिने बारी नजीक असलेला नेकलेस धबधबा पाहण्यासाठी व तिकीट घेण्यासाठी पर्यटकांमध्ये चढाओढ दिसली.

वन विभागाने मानसी तीस रुपये तिकीट ठेवले होते. एकूण ग्रदी पाहता त्र्यंबक वीकेंडच्या पर्यटनातून वन विभागाला ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे समजते आहे.

Tourists throng to enjoy themselves in the water of the waterfall at Pahne Bari. Waterfalls flowing from the hills of Brahmagiri enthrall the tourists with a panoramic view of nature.
Monsoon Tourism : एकावर एक फ्री! या ठिकाणी देवादर्शनासह घेता येईल पावसाळ्याच्या सहलीचा आनंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.