नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौफुली येथे पाठीमागून आलेल्या घंटागाडीने मोपेडला जोरदार धडक दिली असता, मोपेडस्वार महिला रस्त्यावर पडली आणि घंटागाडीच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने तिचा करूण अंत झाला. मयत महिला ही के. के. वाघ महाविद्यालयाची प्राध्यापिका असून, याप्रकरणी संशयित घंटागाडी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Nashik accident death at Amrutdham Chaufuli marathi news)
प्रा. विनिता रामचंद्र कुयटे (२७, रा. मखमलाबाद रोड) असे मयत मोपेडस्वार महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना शनिवारी (ता. २४) सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली आहे.
प्रा. विनिता कुयटे या त्यांच्या मोपेडवरून (एमएच १५ डीजी १२६१) शनिवारी (ता.२४) सकाळी सरस्वती नगर परिसरात असलेल्या के. के. वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात जाण्यासाठी घरून निघाल्या. महामार्गावरील अमृतधाम चौफुलीवर त्या वळण घेत असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या घंटागाडीने त्यांच्या मोपेडला धडक दिली. (Latest Marathi News)
या अपघातात त्या मोपेडवरून खाली पडल्या आणि घंडागाडीच्या चाकाखाली सापडल्या. घंटागाडीचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्या गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.
मयत प्रा. कुयटे यांनी डोक्यात हेल्मेटही घातलेले होते. कुयटे या अविवाहित असून त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात घंटागाडी चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.