Nashik News : राष्ट्रीय व राज्य पातळीवर चमकणाऱ्या खेळाडूंना क्रीडा धोरणांतर्गत शिष्यवृत्ती देण्याची महापालिकेची योजना गुंडाळल्यात जमा आहे. गेल्यावर्षापासून राष्ट्रीय व राज्य पातळीवर स्पर्धांमध्ये चमकणाऱ्या दीडशेहून अधिक खेळाडूंना शिष्यवृत्तीच मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेने क्रीडा धोरण संमत केले आहे. (Sport Scholarship)
या धोरणांतर्गत महापालिकेच्या एकूण अंदाजपत्रकांपैकी पाच टक्के रक्कम क्रीडा धोरण राबविण्यासाठी राखीव ठेवली जाते. क्रीडा धोरणामध्ये महापालिका हद्दीतील आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व राज्य पातळीवरील स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देण्याचे धोरण आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्यास २ लाख रुपये.
द्वितीय क्रमांक मिळाल्यास दीड लाख हजार रुपये व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना १ लाख रुपये शिष्यवृत्ती आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम खेळाडूला ५० हजार रुपये, द्वितीय ६० हजार रुपये, तृतीय क्रमांकाच्या खेळाडूला २५ हजार रुपये तर राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक येणाऱ्या खेळाडूला २० हजार रुपये.
द्वितीय खेळाडूला १० हजार रुपये तर तृतीय क्रमांकावर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला ८ हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीत १० जानेवारी २०२४ ला महापालिकेकडून दुपटीने वाढ करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी महापालिकेकडे दीडशेहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहे. (latest marathi news)
परंतु वर्षभरापासून एकही खेळाडूला क्रीडा शिष्यवृत्ती मिळाली नाही. त्यामुळे महापालिकेने क्रीडा शिष्यवृत्ती गुंडाळली की काय, अशी चर्चा खेळाडूंमध्ये आहे. २०१९ पासून खेळाडूंना शिष्यवृत्ती दिली जाते. पहिल्या वर्षी म्हणजे २०१९-२००० मध्ये २२, २०२०-२०२१ मध्ये ३७, २०२१-२०२२ मध्ये ७, तर २०२२-२०२३ मध्ये १० असे एकूण ७६ खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.
शिष्यवृत्तीसाठी अटी व शर्ती
- खेळास भारतीय ऑलिंपिक, पॅराऑलिंपिक संघटनेची मान्यता.
- खेळाडूची शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडे नोंदणी.
- खेळाचे आयोजन करणारी संघटना मान्यताप्राप्त असावी.
- वर्षात एकाच स्पर्धेतील यशासाठी शिष्यवृत्ती.
- शिष्यवृत्तीसाठी अर्ज बंधनकारक.
- महापालिका हद्दीतील खेळाडूंसाठीच शिष्यवृत्ती.
- स्पर्धेतील विजयाच्या एक वर्षाच्या आत अर्ज बंधनकारक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.