Nashik Police : शनिवारपासून ‘मॉर्निंग वॉक विथ पोलिस’! पोलिस आयुक्तांची संकल्पना

Nashik News : शहरातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी शहर पोलिस आता थेट जॉगिंग ट्रॅकवर येणार आहेत
Sandeep Karnik, Commissioner of Police, Nashik.
Sandeep Karnik, Commissioner of Police, Nashik.esakal
Updated on

नाशिक : शहरातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी शहर पोलिस आता थेट जॉगिंग ट्रॅकवर येणार आहेत. मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी पोलिस अधिकारी थेट संवाद साधणार आहेत. पोलिस आयुक्त ( Commissioner of Police) संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून शनिवार (ता. २४) पासून ‘मॉर्निंग वॉक विथ पोलिस’ उपक्रम सुरू होते आहे. या वेळी नागरिकांना आपापल्या परिसरातील गुन्हेगारीच्या समस्या पोलिसांसमोर थेट मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. (Nashik Walk with Police marathi news)(Latest Marathi News)

नाशिक शहर हे मैदाने आणि जॉगिंग ट्रॅक असलेले शहर म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. जॉगिंग ट्रॅकवर दररोज सकाळ-सायंकाळ नागरिक जॉगिंगसाठी येत असतात. शहरात ३५ जॉगिंग ट्रॅक असून या प्रत्येक ठिकाणी शनिवारपासून पोलिस अधिकारी जॉगिंग ट्रॅकला भेट देत मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक हे स्वत: शनिवारी सकाळी सात वाजता गोल्फ क्लब जॉगिंग ट्रॅकवर मॉर्निंग वॉकसाठी येणार आहेत. त्या वेळी नागरिकांशी संवाद साधणार असून, त्यांच्या समस्यांसह पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय करायला हवे हे जाणून घेणार आहेत.

तसेच, सध्या पोलिसांकडून सुरू असलेल्या कामाचाही फीडबॅक घेणार आहेत. अशारीतीने शहरातील ३५ जॉगिंग ट्रॅकवर पोलिस उपायुक्तांसह सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलिस अधिकारी जाणार आहेत. महिन्यातून एकदा अशाप्रकारचा उपक्रम नियमित राबविण्यात येणार आहे.

असे आहे नियोजन

- जॉगिंग ट्रॅक - ३५; पोलिस अधिकारी - ७८

- जॉगिंग ट्रॅकसाठी नोडल अधिकारी नियुक्त

- अधिकारी सुरक्षेसाठी पेट्रोलिंग व इतर उपाययोजना करतील (Latest Marathi News)

Sandeep Karnik, Commissioner of Police, Nashik.
Nashik News : राज्यात एक लाख नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया; 4 मार्चपर्यंत मोहीम

ठाणेनिहाय जॉगिंग ट्रॅक

- पंचवटी : सहकार महर्षी उत्तमराव ढिकले

- आडगाव : तपोवन व धात्रक फाटा

- म्हसरूळ : चामरलेणी, सुयोजित गार्डनकडील रस्ता, सावरकर गार्डन

- सरकारवाडा : कुसुमाग्रज (पी ॲन्ड टी कॉलनी), रामदास गार्डन

- मुंबई नाका : गोल्फ क्लब मैदान

- भद्रकाली : त्रिकोणी गार्डन

- गंगापूर : समर्थ व कृषीनगर जॉगिंग ट्रॅक

- नाशिकरोड : अमृतवन उद्यान, कलानगर, नरवीर तानाजी मालुसरे, विष्णूनगर उद्यान आणि नाना-नानी पार्क

- देवळाली कॅम्प : बाळासाहेब ठाकरे मैदान, खळवाडी

- उपनगर : शिखरेवाडी मैदान, मुक्तिधाममागील मैदान, डीजीपीनगर-१, गाडेकर मैदान

- अंबड - राजे संभाजी स्टेडिअम, बाळासाहेब ठाकरे जॉगिंग ट्रॅक, राजमाता जिजाऊ मार्ग, वावरेनगर जॉगिंग ट्रॅक, पाटीलनगर जॉगिंग ट्रॅक, पवननगर स्टेडिअम

- चुंचाळे : संत शिरोमणी सावतामाळी उद्यान

- इंदिरानगर : इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, गामणे मळा, पांडव लेणी

- सातपूर : इएसआयसी मैदान

Sandeep Karnik, Commissioner of Police, Nashik.
Nashik AIMA News : अक्राळेतील औद्योगिक भूखंड विक्री लिलाव पद्धतीने करू नका; आयमाचे MIDC अधिकाऱ्यांना साकडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()