Nashik News : भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत शासकीय विभागांविषयी सर्वाधिक तक्रारी

Nashik News : भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या त्रैमासिक सभेत शासकीय विभागांच्या कामकाजांविषयी नाराजीसह सर्वाधिक तक्रारी करण्यात आल्या.
The Corruption Eradication Committee meeting was held at the Collector's office on Monday
The Corruption Eradication Committee meeting was held at the Collector's office on Mondayesakal
Updated on

नाशिक : भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या त्रैमासिक सभेत शासकीय विभागांच्या कामकाजांविषयी नाराजीसह सर्वाधिक तक्रारी करण्यात आल्या. अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. ३०) भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक झाली. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, विभागप्रमुख प्रशांत देशमुख, विठोबा ज्ञानज्ञान, राजेंद्र नानकर, प्रवीण महाजन आदी उपस्थित होते. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातून जातो. (Most complaints about government departments in corruption eradication committee meeting )

या मार्गाचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांनी म्हशीचा गोठा बंगला म्हणून दाखविला आहे. त्या बदल्यात प्रशासनाने शहानिशा न करता मोबदला अदा केल्याचा मुद्दा ॲड. तांबे यांनी उपस्थित केला. जिल्हाधिकारी कार्यालयाने २०१० मध्ये राबविलेल्या तलाठी भरतीत गैरप्रकार झाल्याचा मुद्दा वैशाली देशमुख यांनी मांडला. जिल्हा निवड समितीने अपात्र उमेदवाराला पात्र ठरवून भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय टोकडे ग्रामपंचायतीच्या कामातील भ्रष्टाचार विठोबा ज्ञानज्ञान यांनी उघडकीस आणला आहे. याविषयी प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सदस्यांनी केली.

सहा महिन्यांत निपटारा करा

भ्रष्टाचार निर्मूलन समितीने मांडलेल्या ४२ प्रश्‍नांची पुढील सहा महिन्यांत सोडवणूक न झाल्यास उच्च न्यायालयात जिल्हा प्रशासनाविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोमवारी (ता. ३०) सुपूर्द केले. (latest marathi news)

The Corruption Eradication Committee meeting was held at the Collector's office on Monday
Nashik News : लिंकिंग लिक्विडप्रश्नी कृषिमंत्र्यांबरोबर करणार चर्चा : देवीदास पिंगळे

समितीमधील विषय

- महिरावणी अनुदानित आश्रमशाळेत बनावट हजेरी

- वासाळी (ता. इगतपुरी) उपशिक्षकाकडून दोन लाख ६७ हजारांचा अपहार

- टोकडे (ता. मालेगाव) ग्रामपंचायतीच्या कामात भ्रष्टाचार

- विहिरीसाठी बनावट उत्पन्नाचा दाखला जोडला

- शिक्षण विभागाशी निगडित पाच विविध विषय

- जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयाशी निगडित प्रत्येकी तीन प्रश्‍न

- सहकार, पोलिस व जलसंधारण विभागाचे प्रत्येकी एक प्रकरण

The Corruption Eradication Committee meeting was held at the Collector's office on Monday
Nashik News : प्रसंगावधानामुळे 3 मुलींच्या पित्याचा वाचला जीव; वाहतूक पोलिसांकडून समुपदेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.