Nashik ART HIV Centre : सर्वाधिक HIV उपचार नाशिक एआरटीत! राज्यात अव्वल; 22 गर्भवतींची प्रसुती मात्र बालक अबाधित

Nashik News : गेल्या वर्षी एचआयव्हीने बाधित २२ गर्भवतींची प्रसुती झाली असून, २२ बालक हे एचआयव्ही मुक्त जीवन जगत आहे, ही बाब सेंटरच्याच नव्हे तर आरोग्य विभागाच्या परिश्रमाचे यश मानले जात आहे.
HIV pregnancy
HIV pregnancyesakal
Updated on

Nashik ART HIV Centre : राज्यातील एचआयव्ही बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुरू केलेल्या एआरटी सेंटरमध्ये सर्वाधिक एचआयव्ही बाधित रुग्णांवर उपचार करणारे सेंटर म्हणून नाशिक जिल्हा रुग्णालयातील एआरटी सेंटर ठरले आहे. एचआयव्ही बाधितांवर उपचार करण्यासह त्यांचे समुपदेशन, चाचण्या आणि संधीसाधू आजारांवरही या सेंटरमध्ये उपचार करण्यात आलेले आहेत.

एवढेच नव्हे तर, गेल्या वर्षी एचआयव्हीने बाधित २२ गर्भवतींची प्रसुती झाली असून, २२ बालक हे एचआयव्ही मुक्त जीवन जगत आहे, ही बाब सेंटरच्याच नव्हे तर आरोग्य विभागाच्या परिश्रमाचे यश मानले जात आहे. (Nashik Most HIV treatment in Nashik ART Top in state)

समाजामध्ये आजही एचआयव्ही आजाराविषयी प्रचंड भिती आणि गोपनीयता बाळगली जाते. त्यामुळे बहुतांशी वेळा सदरचा आजार शेवटच्या टप्प्यात असताना रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी येतो. परिणामी वेळ निघून गेलेली असल्याने त्यावर उपचार करणे शक्य होत नाही. परंतु वेळीच निदान झाले तर नियमित औषधोपचाराने रुग्णाला सुसह्य जीवन जगता येते. याच उद्देशाने आरोग्य विभागाने राज्यभरात ५४ एआरटी सेंटर सुरू केले होते. राज्यभरातील जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांचा यात समावेश होता.

२००६ पासून नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात एचआयव्ही बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी एआरटी सेंटर सुरू करण्यात आले आहे. या एआरटी सेंटरकडे १६ हजार ४७७ एचआरव्ही बाधितांची नोंद असून, यातील १४ हजार १५३ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

या दरम्यान, एआरटी सेंटरमधील वैदयकीय अधिकाऱ्यासह समुपदेशकांकडून एचआयव्ही बाधितांचे समुपदेशन केले जाते. बाधित पुरुष असेल तर त्याच्या पत्नीची आरोग्य तपासणी करून त्यांचेही समुपदेशन केले जाते. यामुळे एचआयव्ही संसर्गाचा प्रसार होण्यास आळा घालण्यात या एआरटी सेंटरला यश आलेले असून, ही बाब विशेष मानली जात आहे.

सर्वाधिक चाचण्या अन्‌ समुपदेशन

गेल्या महिन्यात आरोग्य विभागाकडून राज्यातील एआरटी सेंटर्सचा आढावा या विभागाचे प्रमुख डॉ. विजय कुंदेवाड यांच्याकडून घेण्यात आला. यामध्ये राज्यात सर्वाधिक एचआयव्ही बाधित रुग्णांची चाचणी आणि समुपदेशन हे नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या एआरटी सेंटरने घेतल्याचे समोर आले आहे. (latest marathi news)

HIV pregnancy
Rashmi Thackeray: लखलखत्या अंबानींच्या कार्यक्रमात गाजली मराठमोळी पैठणी, रश्मी ठाकरेंनी लावली पैठणी नेसून हजेरी

गत एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या वर्षभरात जिल्ह्यात ६२९ नवीन एचआयव्ही बाधित निष्पन्न झाले होते. यातील ४६ बाधित हे अखेरच्या टप्प्यात उपचारासाठी आल्याने त्यांचा औषधोपचारादरम्यान मृत्यु झाला. तर, ३९ जणांना संधीसाधू आजार क्षयरोग निष्पन्न झाला. या सर्वांवर एआरटी सेंटरमार्फत उपचार सुरू आहेत.

परिश्रमाचे यश

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध पथकाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी योगेश परदेशी, नोडल अधिकारी डॉ. प्रमोद गुंजाळ यांनी एआरटी सेंटरच्या पथकाचे डॉ. सुनील ठाकूर, डॉ. तुषार देवरे, डॉ. सपना सोनवणे यांच्यासह समुपदेशक, परिचारिका, लॅब टेक्निशिअन, फार्मासिस्ट, डाटा मॅनेजर अशा १५ जणांचे पथकाचे अभिनंदन केले आहे. या पथकाकडून घेण्यात आलेल्या परिश्रमामुळेच आज सुमारे १४ हजार बाधित उपचारांमुळे सुसहय जीवनाचा आनंद घेत आहेत.

"नाशिक जिल्हा रुग्णालयाचे एआरटी सेंटर राज्यात सर्वाधिक बाधितांवर उपचार करणारे सेंटर ठरले आहे. यामागे सेंटरमधील प्रत्येकाचे योगदान आहे. ही बाब जिल्हा रुग्णालयासाठी कौतुकास्पद आहे."- डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक जिल्हा रुग्णालय.

"नाशिक एआरटी सेंटरकडे येणार्या प्रत्येक रुग्णांला विश्वासात घेऊन त्याची व कुटूंबियांची चाचणी केली जाते. वेळेत उपचार सुरू केल्यास संबंधित रुग्ण सर्वसामान्य जीवन जगू शकतो. त्यामुळे एचआयव्हीला घाबरून न जाता वेळेत उपचार घ्यावा. रुग्णाची माहिती गोपनीय ठेवली जाते."- डॉ. सुनील ठाकूर, वैदयकीय अधिकारी, एआरटी सेंटर, नाशिक.

HIV pregnancy
Maharashtra News Updates: दिवसभर काय घडलं? एक क्लिकवर वाचा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.