Mumbai Bomb Blast Case : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील सालेमला नाशिक कारागृहात आणण्याच्या हालचाली

Nashik News : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सालेम याच्या नाशिकमधील मुक्कामाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे.
Terrorist Abu Salem
Terrorist Abu Salemesakal
Updated on

Nashik News : कुख्यात गँगस्टर व दहशतवादी अबू सालेमला नवी मुंबईतील तळोजा कारागृह सुरक्षित नसल्याने त्याचबरोबर आतील बांधकामासंदर्भात काही सुधारणा करावयाच्या असल्याने त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलविण्याची तयारी करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. (Moves to bring Abu Salem to Nashik jail in Mumbai blast case)

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सालेम याच्या नाशिकमधील मुक्कामाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. सध्या सालेम हा नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आहे. त्याला नाशिक कारागृहात लवकरच आणले जाणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या. तळोजा कारागृहात ज्या सेलमध्ये अबू सालेम आहे, तेथील काही सेलच्या भिंती व सिलिंग कमकुवत झाल्या आहेत.

त्यामुळे त्या दुरुस्ती अथवा नव्याने उभारण्यात याव्यात, असा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने तळोजा कारागृहाला दिला आहे. त्यामुळे अबू सालेमबरोबरच आणखी काही कैदी इतरत्र हलविण्यात येतील. येरवडा येथील सेलची क्षमता पूर्ण असल्याने तेथे अतिरिक्त कैदी ठेवता येणार नाहीत. त्यामुळे तळोजापासून नाशिक जवळच असल्याने येथे हलविण्यात येणार आहे.

वर्ष १९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू सालेम याला जीवाची भीती सतावत आहे. तळोजा कारागृहातून इतर कारागृहात स्थलांतर करण्याच्या बहाण्याने आपले एनकाउंटर होऊ शकते, अशी भीती त्याने व्यक्त केली. इतकेच नाही, तर त्याने असे स्थलांतर करण्यास परवानगी नाकारण्याची न्यायालयाकडे याचिकेद्वारे विनंती केली आहे. (latest marathi news)

Terrorist Abu Salem
Nashik Bribe Crime : त्र्यंबकच्या भू- करमापकाला लाच घेताना अटक; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

सुनावणीअंती पुढील आदेश येईपर्यंत तळोजा कारागृहातून अबू सालेमचे स्थलांतर करू नये, असे निर्देश विशेष न्यायालयाने तळोजा कारागृह प्रशासनाला दिले होते. मात्र, पुन्हा एकदा त्याला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात आणण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

पोर्तुगालमधून आणले भारतात

एकोणीस वर्षांपूर्वी पोर्तुगालमधून अबू सालेमला भारतात आणले होते. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. ज्या गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षा झालेली आहे, त्या गुन्ह्यातील शिक्षा संपत आली आहे. पोर्तुगालमधून प्रत्यार्पण झाल्यावर अबू सालेमला ऑर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र, तेथे त्याच्यावर हल्ला झाल्यावर त्याला तळोजा कारागृहात ठेवण्यात आले. भारतात प्रत्यार्पित केल्यावर १९ वर्षांपासून अबू सालेम तुरुंगातच आहे.

Terrorist Abu Salem
Nashik Crime News : रिक्षाचालकाला तलवारीने मारून केली लुटमार; नाशिकरोड परिसरात वाढत्या गुंडागर्दीचे आव्हान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.