MP Bhaskar Bhagare : खासदार भगरेंनी वाचला शैक्षणिक समस्यांचा पाढा; संसदेतील पहिल्या भाषणात शैक्षणिक उपेक्षेकडे वेधले लक्ष

Nashik News: गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केंद्राने शिक्षण क्षेत्राकरिता भरीव तरतूद करावी, अशी मागणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी लोकसभेत शिक्षण अनुदान व चर्चा विषयावर बोलताना केली.
MP Bhaskar Bhagare
MP Bhaskar Bhagareesakal
Updated on

लखमापूर- वणी : केंद्र सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रावर मोठा अन्याय झालेला असून, शैक्षणिक क्षेत्रातील समस्या सोडविणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केंद्राने शिक्षण क्षेत्राकरिता भरीव तरतूद करावी, अशी मागणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी लोकसभेत शिक्षण अनुदान व चर्चा विषयावर बोलताना केली. संसदेतील पहिल्याच भाषणात त्यांनी अर्थसंकल्पातील शैक्षणिक उपेक्षेकडे लक्ष वेधले.(MP Bhagare)

शिक्षण विषयावर खासदार भगरे यांनी चर्चेत सहभाग घेतला. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी शिक्षणावरील खर्च वाढवावा, शिक्षक व कर्मचाऱ्यांना भेदभाव न करता जुनी पेन्शन योजना लागू करावी, प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग तसेच महाविद्यालयीन शैक्षणिक प्रश्न तत्काळ सोडवावेत.

स्पर्धा परीक्षा घोटाळे घडू नये म्हणून कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, पेपर फुटीप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी, नाशिक जिल्ह्यात नवीन क्रीडा प्रबोधिनी व्हावी, नाशिक येथे यूपीएससी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करावे, आदिवासी भागातील युवकांना रोजगार मिळण्यासाठी एमआयडीसी सुरू करावी.

आयटीआय प्रवेश क्षमता वाढवून अभ्यासक्रमांच्या संख्येत वाढ करावी, यूजीसी अनुदान वाढवून द्यावे, सर्वशिक्षा अभियानाची योग्य अंमलबजावणी करावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामे लावू नयेत, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात, विद्यार्थी लाभाच्या योजनांमध्ये वाढ करावी. (latest marathi news)

MP Bhaskar Bhagare
Nashik Civil Hospital : बोगस दिव्यांग प्रमाणपत्रामुळे ‘सिव्हिल’वर चौकशीचे ढग

ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेकडे अधिक लक्ष द्यावे, आदिवासी दुर्गम भागात सुरू असलेल्या २० पटाच्या आतील शाळा बंद करण्यात येऊ नये या व इतर अनेक मागण्यांवर खासदार भगरे यांनी चर्चा करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

जुनी पेन्शन सुरू करावी

नव्या-जुन्या पेन्शनमुळे शिक्षकांमध्ये मोठी दरी निर्माण होत असून, सर्वांना जुनी पेन्शन लागू करावी, अशी मागणी खासदार भगरे यांनी केली.

खेळाडूंचा उल्लेख

नाशिक जिल्ह्यातील ऑलिंपिकमध्ये प्रतिनिधित्व केलेले राष्ट्रीय खेळाडू कविता राऊत, मोनिका आथरे, दत्तू भोकनळ यांच्या नावांचा उल्लेख करून क्रीडा क्षेत्रास न्याय देण्याची मागणी खासदार भास्कर भगरे यांनी केली.

MP Bhaskar Bhagare
Nashik News : गृहमंत्रालयाची आज पश्चिम प्रादेशिक परिषद!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.