Nashik-Pune Railway : नाशिक-पुणे रेल्वेमार्गाची फाईल मंत्रालयात धूळ खात! खासदार राजाभाऊ वाजेंनी घेतली माहिती

Nashik News : नाशिक ते पुणे हायस्पीड रेल्वे सुरू करण्याची घोषणा ही लोकसभा निवडणुकीतील ‘जुमला’ ठरण्याची शक्यता आहे. या रेल्वेमार्गाबाबत नाशिकला केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते.
MP Rajabhau Waje
MP Rajabhau Waje esakal
Updated on

Nashik News : नाशिक ते पुणे हायस्पीड रेल्वे सुरू करण्याची घोषणा ही लोकसभा निवडणुकीतील ‘जुमला’ ठरण्याची शक्यता आहे. या रेल्वेमार्गाबाबत नाशिकला केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. मात्र, प्रत्यक्षात रेल्वे मंत्रालयात दोन वर्षांपासून कुठलाही पाठपुरावा झालेला नसल्याने खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाराजी व्यक्त केली. (Nashik-Pune Railway)

नाशिक-पुणे मार्गात बदल करून नाशिक- शिर्डी- पुणे केल्याबद्दलचा साधा प्रस्तावही दाखल झालेला नाही. त्यामुळे दोन वर्षांत या रेल्वेमार्गाची फाईल कोणत्याही चर्चेविना केंद्रीय रेल्वे मंत्रालयात अक्षरश: धूळ खात पडल्याचे वास्तव खासदार वाजे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

त्यांनी या संदर्भात मंगळवारी (ता. ९) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेत सविस्तर माहिती जाणून घेतली. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग २०२१ च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून तो उभारला जाईल.

या मार्गासाठी साधारण १६ हजार कोटी रुपये खर्च येणार असून, त्यातील प्रत्येकी दहा टक्के खर्च राज्य व केंद्र सरकार करणार असून, उर्वरित खर्च कर्ज उभारून केला जाणार आहे. त्यानुसार महारेल कंपनीने भूसंपादन विभागाच्या मदतीने भूसंपादन प्रक्रिया सुरू केली होती. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत या प्रकल्पासाठी ४५ हेक्टर भूसंपादन पूर्ण केल्याचे सांगण्यात येते. (latest marathi news)

MP Rajabhau Waje
Nashik AIMA News : आयमातर्फे ऑगस्टमध्ये ‘बिझिनेस मीट-३’! ललित बूब यांची माहिती

रेल्वेमार्ग व्यवहार्य करण्यासाठी तसेच डोंगर भागातील बोगद्यांचा खर्च वाचविण्यासाठी राज्य सरकारतर्फे हा मार्ग शिर्डीमार्गे वळविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला होता. यामुळे सिन्नर तालुक्यातील रेल्वेमार्ग बदलण्याची शक्यता निर्माण झाली होती. या निर्णयामुळे यापूर्वी संपादित केलेल्या जागेचे करायचे काय, असा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर उभा राहिला होता.

‘महारेल’ने नाशिक व सिन्नर तालुक्यातील २२ गावांमधील सुमारे २८७ हेक्टर जमीन खरेदी करणे प्रस्तावित केले होते. त्यासाठी २५० कोटींच्या निधीपैकी जिल्हा प्रशासनाने १०० कोटींची मागणी नोंदवली आहे. त्यामुळे नाशिक-पुणे रेल्वेमार्ग लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा वाढली होती. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. ८) मंत्रालयात यासंदर्भात बैठक आयोजित केली होती. खासदार वाजे यांनाही या बैठकीला निमंत्रित केलेले होते.

परंतु, पावसामुळे ही बैठक रद्द झाली. खासदारांना अर्ध्या रस्त्यातून परत यावे लागले. आता बुधवारी (ता. १०) ही बैठक होणार असल्याचे समजते. परंतु, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे याविषयी माहिती जाणून घेतली असता नाशिक-पुणे रेल्वेमार्गाविषयी दोन वर्षांत एकही पाऊल पुढे पडलेले नाही. त्यामुळे हा प्रस्ताव धूळ खात गठ्ठ्यात तळाला पडला आहे. त्यावरील धूळ झटकण्याचे काम राज्य सरकारकडून सुरू असल्याचे खासदार वाजे यांनी सांगितले.

MP Rajabhau Waje
Nashik News : वीज कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीवर शिक्कामोर्तब!

यामुळे बदलला मार्ग

नाशिक ते पुणे रेल्वेमार्ग हा २३५ किलोमीटरचा आहे. आता हा मार्ग ३३ किलोमीटरने वाढणार असून, त्याला शिर्डी जोडले जाईल, असा प्रस्ताव तयार केला जाईल. या मार्गावर १२ ते १६ कोचची रेल्वे धावणार आहे. ही रेल्वे सेमी हायस्पीड असेल. विद्यमान मार्गावर एकूण २० स्थानके आहेत. १८ बोगदे आणि १९ उड्डाणपूल आहेत.

परंतु या मार्गावरील बोगद्यांमुळे प्रकल्पाच्या खर्चात प्रचंड वाढ होत असल्याचे कारण देत या दोन शहरांसाठीच असलेला रेल्वेमार्ग व्यवहार्य होत नाही म्हणून रेल्वे मंत्रालयाकडून या मार्गाला मान्यता मिळत नसल्याचे सांगण्यात आले होते. यावर तोडगा काढण्यासाठी ही रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे.

"नाशिक ते पुणे रेल्वेमार्गाचे काम सुरू झाले पाहिजे, यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्वीच्या मार्गात बदल न करता मंजूर मार्गावरून काम सुरू करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. त्यासाठी आपण राज्य सरकारकडे तसेच केंद्राकडे पाठपुरावा करणार आहोत." - राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक

MP Rajabhau Waje
Nashik News : मत्स्यबीज उत्पादनात नाशिक विभाग दुसऱ्या क्रमांकावर!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.