नाशिक : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दाखविलेल्या लाल संविधनावर भाजपने केलेल्या टीकेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. आम्हाला लाल रंगाचे वावडे नाही, देवेंद्र फडणवीस यांना मात्र लाल रंगाचे वावडे आहे. संविधान हे लाल रंगाचेच आहे, साठ वर्षात तुम्ही संविधान पाहिलेच नाही, तेव्हा तुम्हाला संविधानाचा रंग कसा कळणार. शपथ घेताना लाल गालीचा चालतो, परंतु, लाल रंगाचे संविधान मान्य नाही, अशा विकृतींना दूर करून देशाचे संविधान वाचविण्यासाठी महाविकास आघाडीला साथ देण्याचे आवाहन खासदार राऊत यांनी केले. (Sanjay Raut attack on Prime Minister Modi and Amit Shah )