Sanjay Raut News : महाविकास आघाडीचे अद्वय हिरे उमेदवार : खासदार राऊत; मालेगाव बाह्य मतदारसंघासंदर्भात स्पष्टीकरण

Latest Vidhan Sabha Election 2024 News : पक्षातर्फे त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (ता. ५) येथे स्पष्ट केले.
MP Sanjay Raut speaking at a press conference held at the government rest house in Malegaon.
MP Sanjay Raut speaking at a press conference held at the government rest house in Malegaon.esakal
Updated on

मालेगाव : मालेगाव बाह्य मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपनेते अद्वय हिरे हे निवडणूक लढणार आहेत. पक्षातर्फे त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (ता. ५) येथे स्पष्ट केले. (MP sanjay Raut Clarification regarding Malegaon Outer Constituency)

येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी अद्वय हिरे, गणेश धात्रक, लकी खैरनार, आसिफ नॅशनलवाले आदी उपस्थित होते. खासदार राऊत म्हणाले, की बंडूकाका बच्छाव यांना दिल्लीला भेटीसाठी कोणी बोलाविले नाही.

विधानसभेचे तिकीट ‘मातोश्री’वरून दिले जाते, दिल्लीवरून दिले जात नाही. बच्छाव यांचे पुत्र काही वेळापूर्वी त्यांच्या समर्थकांसह मला भेटले. मालेगाव बाह्य मतदारसंघातून अद्वय हिरे हेच महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार असतील. मालेगावची जनता त्यांना संधी देईल. मालेगावचे भावी आमदार तेच आहेत. (latest marathi news)

MP Sanjay Raut speaking at a press conference held at the government rest house in Malegaon.
Dhule Vidhan Sabha Election 2024 : साक्री मतदारसंघ निवडणुकीपूर्वीच लक्षवेधी; भाजपच्या खेळीकडे सर्वांचेच लक्ष

शिवसेना एकच असून, बाळासाहेब ठाकरे यांची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही पंतप्रधान नरेंद्र मोदीअमित शहा यांची सेना आहे. आगामी निवडणुकीत मतदार भाजपला त्यांची जागा दाखवतील. या वेळी जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, अशोक धात्रक, अजय सावंत, जितेंद्र देसले, प्रेम माळी, सुजीत सूर्यवंशी, कैलास तिसगे आदी उपस्थित होते.

पराभव दिसत असल्याने छापे

निवडणुका जवळ आल्या, की भाजपला पराभव समोर दिसत असल्याने राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे दाखवून छापे टाकले जातात, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात यापूर्वी ड्रग्ज प्रकरणी ललित पाटील याचा थेट संबंध शिंदे गट व भाजपतील नेत्यांशी आहे. या प्रकरणी कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

MP Sanjay Raut speaking at a press conference held at the government rest house in Malegaon.
Nashik Vidhan Sabha Election 2024: जिल्ह्यातील 7 मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा! पंधरा मतदारसंघांतून 64 इच्छुकांनी दिल्या मुलाखती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.