चांदवड : शेतकऱ्यांचे अश्रू दुर्दैवाने सरकारला दिसत नाहीत. हा देश शेतकऱ्यांच्या मेहनतीवर उभा आहे. शेतकऱ्यांना असे वाऱ्यावर सोडून चालणार नाही. ८४ वर्षांचे योद्धे शरद पवार शेतकऱ्यांसाठी लढत आहेत. कांद्याला हमीभाव मिळविण्यासाठी ही लढाई आहे. प्रत्येक महिला स्वाभिमानाने उभी राहिली पाहिजे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर सोयाबीन आणि कापसाला सात ते दहा हजार रुपये क्विंटलप्रमाणे भाव दिला जाईल व कांद्याला हमीभाव मिळवून देण्यासाठी मी स्वतः उपोषणाला बसेल. (MP Supriya Sule testimony in meeting of Chandwad that will get guaranteed price for onion)