Nashik MP Rajabhau waje : नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेत नाशिकच्या आरोग्य व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करीत थेट इंग्रजीतून भाषण केले. संदर्भ सेवा रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय, ईएसआयसी रुग्णालय यांच्या अवस्थेबाबत वाजे यांनी सवाल उपस्थित करीत त्यात सुधारणेची मागणी केली. (MP Waje raised questions of district health in Parliament in English)
खासदार वाजे यांनी आदिवासी भागात आरोग्य केंद्राच्या फक्त इमारती उभ्या आहेत; परंतु डॉक्टर, कर्मचारी यांचा अभाव असल्याने आजही आदिवासी भाग आरोग्य सुविधांपासून वंचित असल्याचे सांगितले. नाशिक संदर्भ सेवा रुग्णालयात केंद्र सरकारच्या एनएचएम आणि एनसीडी योजनेच्या अंतर्गत रुग्णांना लाभ मिळावा.
तसेच, संदर्भ सेवा रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय साहित्य तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. यासह, नाशिक शासकीय जिल्हा रुग्णालयातही आगामी कुंभमेळ्यासह अधिकचा भार या अनुषंगाने आरोग्य सुविधांचा आढावा घेऊन लवकरात लवकर जिल्हा शासकीय रुग्णालय अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नपूर्वक पावले उचलावीत, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
सातपूर येथे कामगारांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ईएसआयसी रुग्णालयाबाबत प्रशासनाची हलगर्जी आणि रुग्णांची होणारी हेळसांड याबाबत अनेक तक्रारी मागील काही काळात येत होत्या. नाशिकच्या तब्बल दोन ते तीन लाख कामगारांच्या एकूण १५ लाखांहून अधिक कुटुंबीयांसाठी आरोग्य सुविधेकरिता आधार असलेले हे रुग्णालय केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या निधीतून चालविण्यात येते. (latest marathi news)
मात्र, याच प्रशासनाबाबत मागील काही काळात अनेक तक्रारी असल्याने हे रुग्णालय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून चालविण्यात यावे, अशी मागणी खासदार वाजे यांनी संसदेत केली.
विरोधकांना चपराक
खासदार राजाभाऊ वाजे यांना लोकसभा निवडणूक प्रचाराप्रसंगी विरोधकांनी त्यांच्या पेहरावावरून डिवचले होते. त्यांनी त्याला त्या वेळी कोणतेही विशेष उत्तर दिले नव्हते. मात्र, आपल्या संसदेतील पहिलेच भाषण थेट इंग्रजीतून करीत त्यांनी विरोधकांना चपराक लगावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.