MPSC News : टंकलेखन कौशल्य चाचणी प्रमाणासाठी आयोगाला ई-मेल

MPSC News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे टंकलेखन कौशल्‍य चाचणीस एका जागेसाठी तीन ऐवजी पाच अशा प्रमाणात उमेदवारांना बोलविण्याची मागणी जोर धरत आहे.
MPSC
MPSC esakal
Updated on

MPSC News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे टंकलेखन कौशल्‍य चाचणीस एका जागेसाठी तीन ऐवजी पाच अशा प्रमाणात उमेदवारांना बोलविण्याची मागणी जोर धरत आहे. यासंदर्भात उमेदवारांकडून आयोगाला ई-मेलद्वारे विनंती अर्ज दाखल केले जात असून, एक्‍ससारख्या सोशल मीडिया व्‍यासपीठावरूनही पाठपुराव्‍यासाठी लढाई लढली जाते आहे. (MPSC News)

गेल्या वर्षी अराजपत्रित गट क सेवेच्या सुमारे सात हजार पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यानंतर पूर्व आणि मुख्य परीक्षा झाली होती. निवड प्रक्रियेत आता टंकलेखन कौशल्य चाचणी व्‍हायची आहे. या चाचणीत एका जागेसाठी तीन या प्रमाणात उमेदवार बोलविले जातात.

मात्र अनेक संवर्गांच्या परीक्षा झालेल्‍या असल्‍याने एका जागेसाठी पाच उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी बोलवावेत, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे. (latest nashik news)

MPSC
Nashik Citylinc Bus Strike : NMCला रोजचा साडेआठ लाखांचा भुर्दंड! बससेवा बंदमुळे प्रवाशांची गैरसोय!

त्‍यासाठी वैयक्‍तिक पातळीवर उमेदवार आयोगाला ई-मेलद्वारे विनंती अर्ज दाखल करत आहेत. याशिवाय ‘एक्‍स’ या व्यासपीठावरून ट्विट केले जात आहेत.

आयोगासोबत विविध संवैधानिक पदावरील व्‍यक्‍तींना यासंदर्भात टॅग करताना त्‍यांच्‍यापर्यंत माहिती पोचवत पाठपुरावा केला जात आहे. ‘एक्‍स’वर ट्विटसाठी विशेष हॅशटॅग बनविले आहेत.

MPSC
Nashik News : डोंगरची काळीमैनेला आला बहर! आदिवासी भागातील डोंगरदऱ्यात बहरू लागली करवंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.