Nashik MSBCC Survey: पहिल्याच दिवशी सर्व्हेक्षणाला पोर्टलचा खो! मराठा कुटुंबातील 181 प्रकारची माहिती भरावी लागणार

राज्य मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक मागसलेपण तपासण्यासाठी मंगळवार (ता. २३) पासून सर्वेक्षण सुरू झाले.
MSBCC Survey
MSBCC Surveyesakal
Updated on

येवला : राज्य मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक मागसलेपण तपासण्यासाठी मंगळवार (ता. २३) पासून सर्वेक्षण सुरू झाले.

मात्र, पहिल्याच दिवशी आरक्षणाच्या पोर्टलचा खेळ होऊन नोंदणीला खो बसला. परिणामी, नेमलेल्या प्रगणकांना झाडाखाली बसून दिवसभर पोर्टल सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागली. पोर्टलमध्ये येवला शहराचा पर्याय येत नसल्याने अनेकांना डोक्याला हात लावावा लागला. (Nashik MSB Survey first day of survey portal lost 181 types of information of Maratha family to filled)

सर्वेक्षणासाठी नेमलेले प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण झाले असून, सर्वेक्षण अचूक आणि परिपूर्ण करण्यासाठी घरी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी आवश्यक माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहेत.

३१ जानेवारीपर्यंत मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक, काही ठिकाणी माध्यमिक शिक्षक व पालिका कर्मचाऱ्यांना जबाबदारी दिली आहे.

प्रशासनाने अतिशय जबाबदारीने सर्व्हेक्षण करण्याची सूचना दिल्याने सर्वांनी सर्व्हेक्षण सुरू केले. ग्रामीण भागात काही ठिकाणी सर्व्हेक्षण झाले.

मात्र, शहरात पोर्टलमध्ये येवला ऑप्शनच येत नसल्याने एकही नोंदणी झाली नाही. स्थानिक प्रशासनालाही याबाबत माहिती नसल्याने वर कळविले आहे. काम सुरू आहे, असे उत्तर दिवसभर मिळाले.

गुरुजींवर पुन्हा एक काम!

दहावी-बारावीची परीक्षा, इतर वर्गांची चाचणी व वार्षिक परीक्षेसह अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असताना, पुन्हा तब्बल नऊ दिवसांसाठी प्रगणकाचे काम सोपविल्याने करावे काय, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीचे काम लागणार असून, उत्तरपत्रिका तपासणी, निकाल बनविणे, ही सर्व कामे एकापाठोपाठ आल्याने शिक्षकांवर अतिरिक्त भार पडल्याचे सांगितले जाते. १०० मराठा कुटुंबीयांचे सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकाला दहा हजार रुपये, तर इतर कुटुंबीयांसाठी दहा रुपयांप्रमाणे मानधन मिळणार आहे.

MSBCC Survey
Nashik Political News: नाशिक, दिंडोरी काँग्रेसला मागणारे प्रभारीच भाजपवासी!

असे प्रश्न... असे उत्तर

३७ पानांच्या सर्व्हेक्षणात १८२ प्रश्न आहेत. हे सर्व काम ॲपद्वारे करावे लागणार आहे. एका कुटुंबासाठी सर्व माहिती मिळवून ती भरताना २० ते ३० मिनिटे लागणार आहेत. मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्व्हेक्षण होणार असून, त्यांचीच माहिती सविस्तरपणे भरावी लागणार आहे.

मागासवर्गीय कुटुंबीयांची माहिती भरण्याची गरज नाही. खुल्या प्रवर्गासाठी जात, निवास, घराची मालकी, गावाला जोडणारा रस्ता, नदी, निवासाचा इतिहास, महाराष्ट्रात निवासाचा कालावधी, पारंपरिक व्यवसाय,

सध्याचा व्यवसाय, कुटुंबातील सदस्य नोकरीला आहे का?, डॉक्टर, इंजिनिअर, वकील आहेत का?, राजकीय पदाधिकारी, उत्पन्नाचे स्रोत, घराचे क्षेत्रफळ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय आहे का?, शौचास कुठे जाता, स्नानगृह आहे का?, स्वयंपाकाची खोली, शेतजमीन, वीजपुरवठा, मशागतीची साधने,

शेतीपूरक व्यवसाय, पिकांचा प्रकार, कर्ज, खरेदी-विक्री केलेली मालमत्ता, उत्पन्नाचे स्रोत, विमा संरक्षण, रेशनकार्डचा प्रकार, शेतमजूर, ऊसतोड, वीटभट्टी, उपलब्ध पशुधन, सरकारी योजनांचा लाभ, मुलीचे लग्न,

कुटुंबाच्या उपचाराची साधने, कुटुंबातील सदस्य संख्या, शिक्षण अर्धवट सोडण्याची कारणे, अशी प्रश्नावली आहे. त्यामुळे माहिती घेताना आणि भरताना गुरुजींची परीक्षाच होणार आहे, हे मात्र नक्की!

MSBCC Survey
Nashik News : चौकशीअंती 5 योजनांचे काम सुरू; त्र्यंबक तालुक्यातील जलजीवन योजनांची 2 दिवस चौकशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.