Nashik MSEB News : नामपूरकरांना वीजबिलाचा शॉक! रीडिंग न घेता सरासरीनुसार बिल दिल्याचा आरोप, ग्राहक त्रस्त

Nashik MSEB : शहरातील अनेक घरगुती वीजग्राहकांना वीज वितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा वीजबिले देऊन नागरिकांना शॉक दिल्याच्या तक्रारी आहेत.
Nashik MSEB News
Nashik MSEB Newsesakal
Updated on

Nashik MSEB News : शहरातील अनेक घरगुती वीजग्राहकांना वीज वितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा वीजबिले देऊन नागरिकांना शॉक दिल्याच्या तक्रारी आहेत. वीज कंपनीच्या या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरमहा चारशे ते पाचशे रुपये वीजबिल भरणाऱ्या ग्राहकाला तब्बल दीड हजार रुपयांपर्यंत वीजबिल देऊन सरासरीच्या नावाखाली सरसकट जाचक कर लादला आहे. संबंधित कंपनीने बिलांची दुरुस्ती करून ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. (MSEB Accused of paying average bills without taking readings in nampur )

शिक्षक सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख गोपाळराव गायकवाड अनेक महिन्यांपासून परगावी वास्तव्यास असल्याने गेल्या तीन-चार महिन्यापासून त्यांचे घर कुलूपबंद असतानाही वीज कंपनीने जून महिन्याचे १५९० रुपये बिल आकारल्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. एकदाही वापर नसलेल्या घरात एका महिन्याचे बिल १२० ते दुसऱ्या महिन्याचे बिल १५६० कसे आकारले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. वीज कंपनीकडून ग्राहकांची लूट सुरु आहे. याबाबत ग्राहक मंचाकडे तक्रार करणार असल्याचे श्री. गायकवाड यांनी सांगितले.

रीडिंग न घेता सरासरी बिले

उन्हाळा असल्याने प्रत्येक ग्राहकाने मोठ्या प्रमाणात फॅन, कुलर, टीव्ही, ट्यूब, मिक्सर यांचा वापर केला जातो, त्यामुळे उन्हाळ्यात वीज बिलात वाढ होत असल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे. परंतु अनेकदा थेट मीटर रीडिंग न घेता सरासरी वीजबिले दिली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. वीज वितरण कंपनीने सरासरीचा अर्थ लावताना जाचक अटी-शर्तीचा आधार घेत वीज ग्राहकांची लूट केली आहे. नियमित वीजबिले भरणारे सामान्य ग्राहक या प्रकाराने चक्रावून गेले आहेत.(latest marathi news)

Nashik MSEB News
Nashik MSEB News : वीज पुरवठा खंडित झाल्यास तक्रार नोंदवा

खंडीत वीजपुरवठ्याने वैताग

नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सततचा खंडित व कमी दाबाने होणारा वीजपुरवठा, अव्वाच्या सव्वा येणारे बिल यामुळे वीज ग्राहक हैराण झाले आहेत. त्यामुळे थकीत वीजबिल वसुलीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

''ग्राहकांच्या वीज मीटरचे फोटो काढून, वापरलेल्या युनिटच्या आधारे विजबिले नागरिकांना दिली जातात. नागरिकांना चुकीची बिले आल्यास कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, मीटरच्या रिडींगप्रमाणे बिलात दुरुस्ती करून सुधारित बिले दिली जातील.''- नितीन सूर्यवंशी, उपअभियंता, वीज वितरण कंपनी

Nashik MSEB News
Nashik MSEB News : औद्योगिक ग्राहकांसाठी आता स्वागत सेल; ‘महावितरण’चा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.