Nashik MSEB News : घरगुती वीज ग्राहकाला चक्क 54 हजारांच्या बिलाचा ‘शॉक’! पॉवर सप्लाय कंपनीचा प्रताप

Nashik MSEB : आधीच ‘पॉवर सप्लाय’ कंपनीबाबत वीज ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यातच घरगुती वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बील आकारणी करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहे.
Nashik MSEB News
Nashik MSEB Newsesakal
Updated on

Nashik MSEB News : आधीच ‘पॉवर सप्लाय’ कंपनीबाबत वीज ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यातच घरगुती वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बील आकारणी करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहे. नियमितपणे बील भरणाऱ्या घरगुती ग्राहकाला चक्क ५४ हजार रूपयांच्या वीज बिलाचा ‘शॉक’ दिल्याने या कंपनीच्या कारभाराचे वाभाडे काढले जात आहेत. शहरातील अनेक घरगुती वीजग्राहकांना वीज वितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा वीजबिले देऊन नागरिकांना शॉक दिल्याच्या तक्रारी आहेत. (MSEB bill of 54 thousand to domestic electricity consumer)

पॉवर सप्लायच्या या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अगदी दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या मजुरालाही अशाच प्रकारे बिलाची आकारणी करण्यात आली. यामुळे पॉवर सप्लाय कंपनीविरोधात सर्वपक्षीय आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शहरातील श्री. दशपुते कुटुंबियांना ५४ हजार २९५ रूपये एक महिन्याचे बिल मिळाले असून, दरमहा वेळेवर बिल दिले जात नसल्याचा आरोप या कुटुंबियांनी केला आहे.

बिल मिळत नसल्याबद्दल वारंवार अर्ज केला असल्याचेही सांगितले. परिणामी, तब्बल ८९ हजार १२० रुपयांचे बिल दिल्याने कंपनीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ग्राहक मंचाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सहा महिन्यांपासून सर्वाधिक बिल १२ हजार असताना पाच पटीने आकारणी कशी केली? घरगुती वीज वापर असतांनाच ही लुट नाही का? मिटर रिडींग न घेता सरासरी आकारणीचा गजब फंडा सर्वसामान्य ग्राहकांना भुर्दंड ठरत आहे.

शहरातील काही वीजचोरी करणाऱ्यांचा फटका नियमित वीजबिल भरणाऱ्यांना बसत असल्याची चर्चा आहे. गेल्या पंधरवड्यापासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. कडक उन्हाळ्यातही वीज रात्री-अपरात्री येजा करते. अशातच सुविधा न देता बिलांच्या झटक्याने मालेगावकर वैतागले आहेत. (latest marathi news)

Nashik MSEB News
Nandurbar MSEB News : महावितरणकडून स्मार्ट मीटरची सुरवात स्वतःपासून

सहा महिन्यांचे मिटर रिडींग

डिसेंबर : ७१४

जानेवारी : ७२९

फेब्रुवारी : ७६७

मार्च : ६७६

एप्रिल : ९३९

मे : १७१०

सहा महिन्यात अदा केलेली बिले

ऑक्टोबर : १०९१०

नोव्हेंबर : १४४१०

डिसेंबर : ११६३०

जानेवारी : ११५८०

फेब्रुवारी : १२४७०

एप्रिल : २७१३०

Nashik MSEB News
Nashik MSEB News : वीज पुरवठा खंडित झाल्यास तक्रार नोंदवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.