Nashik MSEB News : वीज पुरवठा खंडित झाल्यास तक्रार नोंदवा

Nashik News : कुठलाही वीज पुरवठा खंडित होऊ नये व झाल्यास तत्काळ सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी सातत्याने रात्रंदिवस कार्यरत असतात.
Nashik MSEB News
Nashik MSEB Newsesakal
Updated on

Nashik News : कुठलाही वीज पुरवठा खंडित होऊ नये व झाल्यास तत्काळ सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी सातत्याने रात्रंदिवस कार्यरत असतात, मात्र महावितरणची सर्वत्र असलेली विद्युत यंत्रणा उघड्यावर असल्याने विविध कारणांमुळे यंत्रणेमध्ये व्यत्यय येतो. (mseb File complaint in case of power outage)

बिघाड मोठा असल्यास वेळ लागू शकतो, त्यामुळे दुरुस्ती काळात विजेवरील अवलंबित्वाची व वाढत्या तापमानामुळे ग्राहकांना विजेअभावी होणाऱ्या त्रासाची महावितरणला जाणीव असून वीज पुरवठा खंडित झाल्यास तक्रार नोंदविण्यासाठी विविध पर्यायांचा ग्राहकांनी वापर करावा आणि संयम राखून या काळात सहकार्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

दरवर्षी महावितरणकडून पावसाळ्यापूर्वी विद्युत यंत्रणेला लागलेल्या झाडाच्या फांद्या काढण्यासह विद्युत वाहिन्या व यंत्रणेची देखभाल दुरुस्तीचे नियोजन करून इतर महत्त्वाची कामे एप्रिल व मे महिन्यामध्ये केली जातात. विद्युत यंत्रणांच्या दुरुस्तीचे वा देखभालीचे काम करायचे असल्यास वाहिनीचा किंवा त्या भागाचा वीजपुरवठा खंडित करावाच लागतो.

त्यामध्ये सर्व भागच वा विद्युत वाहिनी खंडित न करता टप्प्या-टप्प्याने कामे करून तेवढाच भाग खंडित करून त्या भागातील दुरुस्ती व देखभालीची कामे केली जातात. त्यामुळे या दोन महिन्यांमध्ये वीज पुरवठा खंडित राहण्याचे प्रमाण जास्त वाटते. देखभालीचे कामे केल्यानंतरही अनेकवेळा जोरदार वादळी वारा व पावसामुळे झाडे. (latest marathi news)

Nashik MSEB News
Nashik ZP News : चुकीचे कामकाज करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; विविध विभागांतील 5 जणांचे निलंबन

फांद्या पडून तारेवरील डिक्स इंसुलेटरवर आकाशातील वीज पडून तसेच भूमिगत वाहिन्यांत निर्माण होणाऱ्या तांत्रिक दोषामुळे यंत्रणेचे नुकसान होते. सोबतच वीज पुरवठा खंडित होऊन सुरळीत होण्यास वेळ लागल्यास महावितरणचेही आर्थिक नुकसान होते. वीज पुरवठा खंडित झाल्यास महावितरणशी संपर्क साधण्याचे खालील माध्यम उपलब्ध आहेत.

इथे करा तक्रारी

मोबाईल ॲप: प्लेस्टोअर, विंडोज स्टोअर व ॲपस्टोअरहून महावितरणचे मोबाईल ॲप डाऊनलोड करता येते. या ॲपमध्ये वीजबिलाची माहिती, तक्रार नोंदणी आदी सुविधा सहजपणे उपलब्ध आहेत. त्याचा वापर करा.

ऊर्जा चॅटबॉट : आपण मोबाईल अँप किंवा www.mahadiscom.in संकेतस्थळाचा वापर केला तर आपल्याला उजव्या कोपऱ्यात ऊर्जा चॅटबॉटचे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चिन्ह दिसेल. याच्या माध्यमातून आपला मोबाईल क्रमांक किंवा ग्राहक क्रमांक नोंदवून तक्रार नोंदवण्यासह इतर सुविधांचा वापर करू शकता. विजेसंबंधीच्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी १८००२३३३४३५ व १८००२१२३४३५ तसेच १९१२ अशा तीन टोल फ्री क्रमांकाची सोय कंपनीने केली आहे. मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राद्वारे या क्रमांकावर २४ तास सेवा दिली जाते.

Nashik MSEB News
Nashik Dengue Update : जिल्ह्यात 99 रुग्णांना डेंगीची लागण; ग्रामीण भागातही प्रादुर्भाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.