MSRTC Commercial Tender : नाशिक विभाग एसटी कार्यालय आवारात निविदाधारकांचा गदारोळ!

Nashik News : महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाच्‍या नाशिक विभागांतर्गत येणाऱ्या ७१ आस्थापनासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत होती.
MSRTC Commercial Tender
MSRTC Commercial Tenderesakal
Updated on

नाशिक : महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाच्‍या नाशिक विभागांतर्गत येणाऱ्या ७१ आस्थापनासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत होती. या प्रक्रियेअंतर्गत यापूर्वीच्‍या वेळापत्रकानुसार शुक्रवारी (ता. १२) निविदा खुल्या करण्यात येणार होते. परंतु आचारसंहितेमुळे आता ४ जूननंतर निविदा जाहीर केले जाणार असल्‍याचे एसटी महामंडळ प्रशासनाने जाहीर केले. यानंतर निविदाधारकांनी कार्यालयाचा आवारात गदारोळ घातला. (Nashik MSRTC Commercial Tender news)

बसस्थानकावरील रिक्‍त असलेल्‍या वाणिज्‍य आस्‍थापना भाडेतत्‍वावर देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाते आहे. याअंतर्गत सुमारे पावणेदोनशे जणांनी निविदा दाखल केलेले होते. यापूर्वीच्‍या नियोजित वेळापत्रकानुसार शुक्रवारी निविदा खुले करणे अपेक्षित होते. मात्र काही दिवसांपूर्वीच आचारसंहिता जाहीर झालेली असल्‍याने, निविदा खुल्या करण्यास एसटी प्रशासनाने नकार दिला.

निवडणूक प्रक्रियेनंतर जूनमध्ये निविदा खुल्या केल्या जातील, असे सांगितले. मात्र या भूमिकेशी सहमत न झाल्‍याने निविदाधारकांनी एसटी महामंडळाच्‍या एनडी पटेल मार्गावरील कार्यालय‍ आवारात गर्दी करत निविदा खुले करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. मात्र एसटी प्रशासनाने आपल्‍या भूमिकेबद्दल सूचना फलकावर लेखी सूचना प्रसिद्ध करताना आंदोलनकर्त्यांना दाद दिली नाही.  (latest marathi news)

MSRTC Commercial Tender
Ishan Kishan: ईशानने 'ब्रेक' घेण्यावर सोडलं मौन, टी20 वर्ल्डकपसाठी निवडीबाबतही मोठं भाष्य; वाचा काय म्हणाला

असा आहे आक्षेप..

निविदाधारकांनी निर्धारित अनामत रक्‍कम अदा केलेली होती. आचारसंहितेची अडसर होती तर अनामत रक्‍कम एसटी महामंडळ प्रशासनाने स्‍वीकारायला नको होती, असा आक्षेप काही निविदाधारकांनी घेतला. दरम्‍यान या प्रकरणी न्‍यायालयात धाव घेण्याबाबत विचार केला जाणार असल्‍याचेही काहींनी सांगितले.

"निविदा जाहिरात प्रसिद्ध झाली, तेव्हा आचारसंहिता जाहीर झालेली नव्‍हती. सध्या आचारसंहिता लागू झालेली असल्‍याने, नियमावलीनुसार निविदा खुली केल्‍याने आचारसंहितेचे उल्‍लंघन होऊ शकते. त्‍यामुळे निवडणूक प्रक्रियेनंतर निविदा खुले केले जातील."

- अरुण सिया, विभागीय नियंत्रक, नाशिक विभाग.

MSRTC Commercial Tender
Nashik Gold Market: सोन्‍याच्‍या दरात मोठी उसळी; 74 हजार रुपये तोळ्यांवर झेप! अक्षय तृतीयेपर्यंत दरांमध्ये आणखी वाढीचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.