Nashik Monsoon News : पहिल्याच पावसात सटाणा शहरातील रस्त्यांवर चिखल; दुचाकीचालकांचा जीव मुठीत धरुन प्रवास

Nashik News : सटाणा शहर व नववसाहतींमधील रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने दुचाकीधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे.
Swamp and mud caused by rain on every road in Navvasah from Satana city to Chaugaon road.
Swamp and mud caused by rain on every road in Navvasah from Satana city to Chaugaon road.esakal
Updated on

Nashik News : खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीनंतर पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बागलाणवासियांना आद्रा नक्षत्रातील पावसाने काहीसा दिलासा दिला. तर सटाणा शहर व नववसाहतींमधील रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने दुचाकीधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. (Mud on streets of Satana city in first rain)

गेल्या सहा महिन्यांपासून खड्डे पडले असून, दिवसेंदिवस ते मोठे होत आहेत. पावसाळ्यापूर्वी मुरूम टाकून खड्डे भरण्याची मागणी नागरिकांनी केली होती. मात्र, पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांचे हाल होत आहे. खड्ड्यांमधील पाणी पायी चालणाऱ्यांवर उडत असल्याने जागोजागी हमरी-तुमरीचे प्रकार वाढले आहेत.

रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांमध्ये खरिपाच्या पेरणीबाबत चिंतेचे वातावरण होते. सोमवारी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत असल्याने हरणबारी व केळझर हे दोन्ही मध्यम प्रकल्प कोरडे झाले होते.

जमिनीतील पाणीपातळी खोल गेल्याने सर्वच पाणी योजनांच्या उद्भव विहिरींनी तळ गाठल्याने पाणी योजना निकामी होऊन तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. सर्वत्र पुरेसा नसला तरी विरगाव, वनोली, वटार, विंचुरे, डांगसौंदाणे, तहाराबाद, ठेंगोडा आणि सटाणा शहर व परिसरात बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (latest marathi news)

Swamp and mud caused by rain on every road in Navvasah from Satana city to Chaugaon road.
Nashik Monsoon News : दुष्काळी तालुक्यातील टॅंकरची संख्या घटली! जिल्ह्यात 350 टॅंकर सुरू

ताहाराबाद नाका रस्ता खडतर

सटाणा शहरातून जाणाऱ्या विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. ताहाराबाद नाक्यापासून बसस्थानकापर्यंत डाव्या बाजूने रस्त्याचे खोदकाम सुरू असल्यामुळे मोठमोठे खड्डे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरल्याने रस्ता दिसेनासा होऊन वाहतुकीस मोठा अडथळा तयार झाला आहे.

भराव काढण्यासाठी खोल केलेल्या रस्त्यावर ठेकेदाराने तत्काळ मुरूम- खडीचे पिचिंग करून रस्ता रहदारीयोग्य करून द्यावा, अशी मागणी विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या व्यावसायिकांनी केली आहे.

Swamp and mud caused by rain on every road in Navvasah from Satana city to Chaugaon road.
Nashik Monsoon News : दमदार पावसाने शेतमजुरांच्या हाताला काम; कसमादे पट्ट्यातील शेतीकामांना वेग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.