Nashik News : चार दिवसांवर आलेली आषाढी एकादशी, मोहरम तसेच लग्नसराईच्या अखेरचा टप्प्यात मोठ्या प्रमाणावर विवाह तिथी असल्याने सर्वच प्रकारच्या फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मात्र पुरवठ्यापेक्षा मागणीत अधिक वाढ झाल्याने सर्वच प्रकारच्या फुलांच्या भावात तेजी आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप चालू आहे. (Muharram and Ashadhi Ekadashi has increased demand for flowers)
त्यामुळे गणेशवाडी येथील फूल बाजारातील आवकेत मोठी घट झाली आहे. दुसरीकडे अवघ्या चार दिवसांवर आलेली आषाढी एकादशी, मुस्लिम बांधवांचा मोहरम एकाच दिवशी आला आहे. यामुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यातच लग्नसराईचा अखेरचा टप्पा सुरू झाल्याने फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात मोठी घट झाल्याने क्रेटभर पिवळ्या झेंडूसाठी पाचशे ते साडेपाचशे रुपये मोजावे लागत आहेत. एरवी शंभर ते एकशेवीस किलो भावाने उपलब्ध होणारी शेवंतीसाठी एकशे साठ ते दोनशे रुपये मोजावे लागत आहेत. निशिगंध, मोगरा, गुलाब, लिली यांच्या मागणीतही मोठी वाढ झाल्याने त्यांचेही भाव तेजीत आहेत.
भाज्यांच्या भावात उसळी
फुलांबरोबरच सर्व प्रकारच्या भाज्यांच्या आवकेत मोठी घट झाली आहे. त्यामुळे किलोभर वांगी, टोमॅटो, भेंडी, गावठी गवारसाठी शंभर ते एकशेवीस रुपये मोजावे लागत आहेत. एकीकडे पावसामुळे भाजीपाला खराब होत आहे, दुसरीकडे भावही मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक गृहिणींनी कडधान्याला पसंती दिली आहे. मेथी व कोथिंबिरीची जुडीही चाळीस ते पन्नास रुपयांपर्यंत पोचली आहे. (latest marathi news)
फुलांचे भाव पुढीलप्रमाणे -
झेंडू - ४५० ते ५५०
निशिगंधा - १८० ते २००
शेवंती - १८० ते २००
गुलाब - २५ ते ३० रू गड्डी (बारा फुले)
लिली बंडल - १५ ते २० रुपये.
"सध्या लग्नसराई सुरू आहेत. याशिवाय पुढील आठवड्यात आषाढी एकादशीसह मुस्लिम बांधवांचा मोहरम आहे. त्यामुळे फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे, तुलनेत पुरवठा कमी असल्याने फुलांच्या भावात मोठी वाढ झाली आहे." - कल्पेश रासकर, फूल विक्रेता संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.