Nashik: गोदावरीचे संकट दूर करण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्‍यांचा पुढाकार; ‘द गोदावरी इनिशिएटिव्‍ह’ करणार नदीच्‍या समस्‍येवर काम

Nashik: गोदावरी नदीला वेगवेगळ्या टप्प्‍यात नानाविध समस्‍यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी शासन, प्रशासनासह अनेक स्‍वयंसेवी संस्‍था काम करत आहेत.
godavari river
godavari riveresakal
Updated on

नाशिक : गोदावरी नदीला वेगवेगळ्या टप्प्‍यात नानाविध समस्‍यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी शासन, प्रशासनासह अनेक स्‍वयंसेवी संस्‍था काम करत आहेत. आता गोदावरी नदीवरील संकट दूर करण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्ही सरसावल्‍या असून, ‘द गोदावरी इनिशिएटिव्‍ह' हाती घेतला आहे. यासंदर्भातील माहिती ‘डियाजिओ’चे उपाध्यक्ष (सीएसआर व शाश्‍वत विकास) नवदीप सिंग मेहरम यांनी ‘सकाळ’ला दिली. ते म्‍हणाले, की ‘डियाजीओ’तर्फे समाजाप्रति बांधिलकी जपताना विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. (Multinational Corporations initiative to solve Godavari river crisis )

याअंतर्गत नुकताच मुंबईमध्ये ‘द गोदावरी इनिशिटिव्‍’चा प्रारंभ आला आहे. गोदावरी रिव्‍हर मॅनेजमेंट बोर्डचे अध्यक्ष मुकेश कुमार सिन्‍हा यांच्‍या उपस्‍थितीत हे उद्‌घाटन झाले. याअंतर्गत नदीशी संबंधित विविध घटकांना एकत्र आणण्यासाठी कंपनीने पुढाकार घेतला आहे. उद्योजक, प्रशासकीय यंत्रणा, स्‍वयंसेवी संस्‍था, शेतकरी, नागरिकांना एकमेकांशी जोडत गोदावरीला समस्‍यांच्‍या विळख्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्‍न असेल.

या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी आंतरराष्ट्रीय स्‍तरावर कार्यरत डियाजिओ पीएलसी, जीएसके, कोलगेट यासह इतर विविध बहुराष्ट्रीय कंपन्‍या योगदान देण्यास उत्‍सुक आहेत. पहिल्‍या टप्‍यात विविध घटकांशी चर्चा करुन समस्‍या निश्‍चित केल्‍या जातील. यानंतर या समस्‍यांच्‍या सोडवणूकीवर काम केले जाणार असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले. (latest marathi news)

godavari river
Nashik News : एकनाथ खडसेंना तूर्त ‘नो एन्ट्री’; नाशिकच्या विभागीय मेळाव्यातील प्रवेशावरून दानवेंचे स्पष्टीकरण

पहिला टप्पा सहाशे किलोमीटरचा

या उपक्रमांतर्गत पहिल्‍या टप्‍यात गोदावरी उगम त्र्यंबकेश्‍वरपासून तर नांदेडपर्यंतच्‍या अशा सहाशे किलोमीटर भागात काम केले जाईल. यादरम्‍यान येणार्या सात जिल्‍ह्‍यांमध्ये विविध घटकांशी चर्चा केली जाणार असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले.

ॲक्‍शन प्‍लॅन आखणार

प्रारंभी विविध घटकांशी चर्चा केल्‍यानंतर समस्‍या निश्‍चिती केली जाईल. या समस्‍यांवर कुठल्‍या स्‍वरुपाचे उपाय करता येतात, यासंदर्भात ॲक्‍शन प्‍लॅन तयार केला जाणार आहे. यामध्ये कामाचे टप्पे व निश्‍चित कालावधी ठरविला जाईल, असे नवदीप सिंग मेहरम यांनी नमूद केले.

godavari river
Nashik Coconut Price Hike : तेलानंतर आता खोबरे वधारले; किलोमागे सरासरी 100 रुपयांची वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.