Mumbai Nashik Highway : नाशिक- मुंबई द्रुतगती महामार्गावरून विनाअडथळा जलद वाहतूक होण्यासाठी ठिकठिकाणी पाच अंडरपासची कामे सुरू आहेत. परंतु दोन- अडीच वर्षांपेक्षाही अधिकचा कालावधी जाऊनही एकही अंडरपास पूर्णत्वास आलेला नाही. यामुळे वाहतूक मंदावली आहेच परंतु स्थानिकांनाही वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागते आहे. अवघ्या दीडशे किलोमीटरसाठी किमान पाच ते सहा तास प्रवासाला लागत असेल तर नाशिक- मुंबई द्रुतगती महामार्ग म्हणायचे का, अशीच संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी ‘सकाळ’ शी बोलताना दिली. (Nashik Mumbai expressway bad road condition )