Nashik Municipal Commissioner : नाशिकची क्रमवारी उंचावण्यासाठी प्रयत्न; डॉ. अशोक करंजकर यांचा संकल्प

Newly appointed Commissioner of Municipal Corporation Dr. Additional Commissioner Pradeep Chaudhary welcoming Ashok Karanjkar.
Newly appointed Commissioner of Municipal Corporation Dr. Additional Commissioner Pradeep Chaudhary welcoming Ashok Karanjkar. esakal
Updated on

Nashik Municipal Commissioner : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने विकासाचे नियोजन तसेच बाह्यवळण रस्ता व स्वच्छ भारत सर्वेक्षणामध्ये नाशिकची क्रमवारी उंचावण्यासाठी आपले प्रयत्न राहतील, असा संकल्प महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी शनिवारी (ता.२२) बोलून दाखवला.

महापालिकेचे ४६ वे आयुक्त म्हणून डॉ. करंजकर यांची नियुक्ती राज्य शासनाने केली. शनिवारी त्यांनी महापालिका मुख्यालयात प्रशासनाकडून पदभार स्वीकारला. (Nashik Municipal Commissioner Dr Ashok Karanjkar Efforts to raise ranking of news)

या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी कामकाजाची दिशा स्पष्ट केली, ते म्हणाले, २०२७ मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा असला तरी त्याचे नियोजन आत्ताच करावे लागणार आहे.

कुंभमेळ्याचे नियोजन करण्याची मला संधी मिळाली. त्यामुळे काटेकोर नियोजन केले जाईल. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शासनाला लवकरच विकास आराखडा सादर केला जाणार आहे. बाह्य रिंगरोड तयार करण्याचे नियोजन आहे. या रिंगरोडला आपले प्राधान्य राहील. सिंहस्थानिमित्त लाखो भाविक व पर्यटक नाशिकमध्ये येतील.

त्यामुळे शहर स्वच्छतेला आपले प्राधान्य राहील. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये नाशिक शहराची क्रमवारी घसरली आहे, ती क्रमवारी सुधारताना पहिल्या दहा शहरांमध्ये आणण्याचे आपले लक्ष राहील. घरपट्टी, पाणीपट्टीची शंभर टक्के वसुली तसेच महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी पर्यायी स्रोत आपण तयार करणार असल्याची माहिती करंजकर यांनी दिली.

अनियमिततेची चौकशी

मागील दीड महिन्यापासून नाशिक महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त नाही. त्यामुळे कामकाज रामभरोसे चालले. नवीन आयुक्तांची नियुक्ती होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Newly appointed Commissioner of Municipal Corporation Dr. Additional Commissioner Pradeep Chaudhary welcoming Ashok Karanjkar.
Nashik Municipal Commissioner : पालकमंत्र्यांच्या स्पर्धेत भुसेंची बाजी; महापालिका आयुक्तपदी 'यांची' नियुक्ती

प्रस्ताव मंजूर करताना नियमित आयुक्तांकडे आवकजावक रजिस्टरमध्ये कामाची नोंद झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.

सदर कामकाज नियमाला धरून नाही. मागील आठ ते दहा दिवसांमध्ये जवळपास दोनशे होऊन अधिक फाइल मंजूर झाल्या. यात नगररचना व बांधकाम विभागाच्या अधिक फाइल असल्याची चर्चा आहे.

प्रस्ताव मंजुरीसाठी आयुक्त कार्यालयातील आवकजावक रजिस्टरमधील नोंद होणे आवश्यक असताना अतिरिक्त आयुक्त कार्यालयात नवीन रजिस्टर ठेवल्याने या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. करंजकर यांनी प्रस्तावांची तपासणी करून अनियमित कामांमध्ये दुरुस्ती केली जाईल. त्याचबरोबर प्रशासकीय नियमावली तपासून अनियमितता असेल तर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईदेखील करणार असल्याचे सांगितले.

"नव्याने पदभार घेतला असून, अधिकाऱ्यांच्या बैठक घेऊन महापालिकेचे कामकाज समजून घेईल. त्याचबरोबर मागील काही दिवसात मंजूर झालेल्या प्रस्तावासंदर्भात चौकशी करून अनियमितता असेल तर दुरुस्ती केली जाईल. चौकटी बाहेर कामकाज झाले असेल तर नियमानुसार कारवाई केली जाईल." - डॉ. अशोक करंजकर, आयुक्त, महापालिका.

Newly appointed Commissioner of Municipal Corporation Dr. Additional Commissioner Pradeep Chaudhary welcoming Ashok Karanjkar.
Nashik District Collector : आव्हान नव्हे, तर जबाबदारी म्हणून काम : जलाज शर्मा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.