Nashik News : प्रशासनातील बेशिस्तीला आयुक्तांचा लगाम; अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता

Nashik News : प्रशासकीय कामकाजातील बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी कार्यपद्धती निश्चित केली आहे.
NMC Nashik
NMC Nashik esakal
Updated on

Nashik News : प्रशासकीय कामकाजातील बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्या कार्यपद्धतीत संचिका सादर करताना त्यावर विषय, क्रमांक, अनुक्रमणिका, टिपणी, पत्रव्यवहार, विभाजक, पान क्रमांक नमूद असावा, मोघम टिपणी मंजुरीसाठी सादर करू नये. अशा स्पष्ट सूचना देणारे परिपत्रक जारी केले आहे. (Municipal Commissioner has fixed procedures to curb indiscipline in administrative work)

महापालिकेमध्ये आयुक्त हे सर्वेसर्वा असतात. विविध विभागाकडून आयुक्तांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केले जातात. आयुक्तांनी घेतलेला निर्णय हा अंतिम असतो. नस्तीमधील प्रस्तावांना मंजुरी देताना त्यावर नियमानुसार आदेश, तारीख, स्वाक्षरी रजिस्टरला नोंद असणे आदी बाबी महत्त्वाच्या असतात. मात्र गेल्या काही दिवसात अशा प्रकारच्या संचिका आयुक्तांकडे सादर करताना नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

कागदपत्रांवर पान क्रमांक नमूद नसणे, विभाजक नसणे या प्रकारांमुळे कामकाजाविषयी संशय निर्माण झाला. त्याअनुषंगाने आयुक्त डॉ. करंजकर यांनी प्रशासकीय कामकाजासाठी कार्यपद्धती निश्चित करणारे पत्रक सादर केले. यात संचिका अथवा नस्ती सादर करताना काय हवे, याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. आयुक्तांच्या या सूचनेनंतर प्रशासकीय कामकाजातील बेशिस्तपणा समोर आला आहे.

संचिका सादर करताना त्यावर विषय व त्या विषयाचा क्रमांक, अनुक्रमणिका, टिप्पणी, पत्रव्यवहार, विभाजक, पान क्रमांक नमूद असणे या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर शासन संदर्भातील काही परिपत्रक व आदेश असल्यास किंवा महासभा व स्थायी समितीचा ठराव असल्यास त्याचा स्पष्ट उल्लेख करून त्याची टिपणी जोडणे बंधनकारक आहे. (latest marathi news)

NMC Nashik
Nashik News : एअरलाईन्सचा गलथानपणा! विमान प्रवाशांना घेऊन हैदराबादला अन लगेज् नाशिकमध्येच

नस्ती सादर करताना काल मर्यादेचा उल्लेख करण्याबरोबरच लेखा व लेखापरीक्षण विभागाचा अभिप्रायदेखील बंधनकारक केला आहे. मूळ कामांचा खर्च प्रशासकीय मंजुरीपेक्षा दहा टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर सुधारित प्राकलनासाठी स्थायी समितीची मंजुरी बंधनकारक आहे. तांत्रिक मान्यतेनंतर आराखड्यात बदल करण्यासाठी प्रस्ताव सादर करून मान्यता घेणे गरजेचे असल्याचे पत्रात म्हटले आहे.

देयके सादर करतानादेखील प्रशासकीय वित्तीय मान्यतेचे ठराव कार्यादेश करारनामा, मक्तेदाराने सादर केलेले देयके, खरेदीची प्रमाणित देयके, प्रशासकीय आदेश संबंधित कामांची मूळ संचिका, प्रमाणितसाठी नोंदवही, निविदा अटी व शर्तीनुसार पूर्ण झाल्याचे गुणवत्ता व नियंत्रण कक्षाचे प्रमाणपत्र, रॉयल्टी चार्जेस भरल्याच्या पावत्या, सिमेंट, डांबर, स्टील यांचे तपासणी अहवाल जोडणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

गैरव्यवहार टाळण्याच्या सूचना

विविध कर विभागाच्या माध्यमातून महसुली व इतर जमा होणारे रोख रक्कम तसेच धनादेश व ऑनलाइन पद्धतीने प्राप्त होणाऱ्या भरणा संदर्भात कायद्यातील तरतुदीनुसार लेखी ठेवणे व वित्त व लेखा विभागाने घेऊन तरतुदींचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. निर्दोष संगणक प्रणालीचा वापर करून अनियमित व गैरव्यवहार टाळण्याच्या सूचना आयुक्तांनी खाते प्रमुखांना दिल्या आहेत.

NMC Nashik
Nashik Onion News : कांदा पुन्हा रडवणार महिन्यात भाव दुप्पट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.