नाशिक : घरपट्टी वसुली वाढवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून मिळकतधारकांना बाह्य अभिकरणाच्या माध्यमातून देयके वाटप केले जाणार आहे. मक्तेदारांवर नियंत्रण तसेच आधुनिक पद्धतीने देयके व मिळकतींची माहिती मिळावी यासाठी घरपट्टीसाठी अँड्रॉइड ॲप विकसित केले जाणार आहे.
या माध्यमातून मिळकतधारकांना व्हाट्सॲपवर मागणी देयके प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर ॲपच्या माध्यमातून शहरातील सर्व मिळकती महावितरण तसेच नोंदणी व मुद्रांक विभागाशीदेखील संलग्न केल्या जाणार आहे. (Nashik Municipal Corporation Android App for gharpatti Payment nashik news)
महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने मालमत्ता करासाठी संगणक कार्यप्रणाली विकसित करण्यात आली. मात्र सदर प्रणाली कालबाह्य ठरली. राज्य शासनाने पंधराव्या वित्त आयोगाच्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
त्यात महावितरण व नोंदणी व मुद्रांक विभागाशी मिळकती संलग्न करताना कालबाह्य कार्यप्रणाली अडचणीची ठरत आहे. दुसरीकडे महापालिकेने घरपट्टी देयके ग्राहकांना वेळेत मिळावी यासाठी देयकेवाटप आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठीदेखील नवीन कार्यप्रणाली विकसित करणे गरजेचे असल्याने महापालिकेने अँड्रॉइड ॲप विकसित करण्याचा निर्णय घेतला. पुणे व पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर नवीन संगणकीय प्रणाली विकसित केली जाणार आहे.
त्यासाठी १ कोटी ९० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून महासभेची मंजुरी घेण्यात आली आहे. नवीन संगणक प्रणाली विकसित करताना अँड्रॉइड ॲप तयार केले जाणार असून या माध्यमातून ग्राहकांना व्हाट्सॲपद्वारे देयके, दंड तसेच ऑनलाइन मालमत्ता कर भरण्याची सुविधा प्राप्त करून दिली जाणार आहे.
मिळकतींची माहिती एका क्लिकवर
नवीन संगणकीय प्रणाली तसेच अँड्रॉइड ॲपच्या माध्यमातून घरपट्टीचे देयके वाटप करणाऱ्या मक्तेदार कंपन्यांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. कर आकारणी विभागातील कर्मचाऱ्यांचा दैनंदिन अहवाल देखील या माध्यमातून मिळणार आहे.
थकबाकीची नोटीस बजावणे, सूचना देणे, कर निर्धारण देयके पाठविणे, जप्तीचे अधिपत्र बजावण्याची कामे या माध्यमातून होतील. मालमत्तांचा संपूर्ण पत्ता, विद्युत देयक, ग्राहक क्रमांक, पाणीपट्टी या संदर्भात माहिती संकलित केली जाणार आहे.
अँड्रॉइड ॲपवर मिळकतीचे जीआयएस मॅपिंग करून डीजिटीलायझेशन प्रॉपर्टी टॅक्स रजिस्टर देखील तयार केले जाणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.