नाशिक निवडणुक | बिग फाइटमध्ये नवोदितांना संधी

उच्‍चशिक्षित मतदारांचा प्रभाव ; सोसायट्यांचे प्रश्न ठरणार महत्त्वाचा विषय
Nashik Municipal Corporation Election
Nashik Municipal Corporation Electionsakal
Updated on

नाशिक : पुणे महामार्गाच्या दक्षिणेचा शेकडो बहुमजली इमारतीच्या भाजप प्रभावाच्या प्रभागात या वेळी झोपडपट्टीसह बराच शिवसेनेच्या प्रभावाचा भाग जोडला गेल्याने बिग फाईटमध्ये नवोदितांना संधी आहे. उच्‍चशिक्षित मतदारांचा प्रभाव क्षेत्रात सोसायट्यांचे प्रश्न हा या भागातील महत्त्वाचा विषय असणार आहे. सध्याच्या प्रभाग वीसमध्ये चारही भाजपचे नगरसेवक असून हा सगळाच भाग नव्या प्रभागात जोडला गेला आहे. याशिवाय दत्तमंदिर भागासह जय भवानी रोड शिवसेनेच्या प्रभावाचा भाग यात समाविष्ट झाल्याने युतीत रस्सीखेच होणार आहे.

प्रख्यात पर्यटनस्थळ मुक्तिधाम, गायकवाड मळा, भालेराव मळा, धोंगडे मळा, जगताप मळा आदी मळे विभाग समाविष्ट आहे. जेतवननगर, फर्नांडिस वाडी, भालेराव मळ्यासह काही झोपडपट्यांचा भाग आहे. याशिवाय नाशिक- पुणे महामार्गालगतच्या बिटको, दत्तमंदिरपासून तर उपनगर नाक्यापर्यंतचा शेकडो बहुमजली इमारतीचा या परिसरात समावेश आहे. दत्तमंदिर आणि जयभवानी रोड अशा प्रमुख दोन मार्गावरील वसाहती हे या प्रभागाचे प्रभाव पाडणारे घटक आहेत. तरण तलाव, जॉगिंग ट्रॅक, आरोग्य विषयक आणि सामाजिक उपक्रम राबविणारे सर्वाधिक मंडळ आणि संस्था याच भागात आहे. त्यामुळे अगदी अमरनाथ यात्रोत्सवापासून श्रावणातील व्रतवैकल्यापासून तर तर कोरोनासारख्या सामाजिक आपत्तीत या भागात कार्यकर्ते मदतीसाठी हिरिरीने पुढे राहतात, असे चित्र कायम दिसले आहे.

हे आहेत इच्छुक

संगीता गायकवाड, हेमंत गायकवाड, कोमल मेहोरोलिया, रमेश धोंगडे, कल्पना लवटे, अतुल धोंगडे, कैलास गायकवाड, डॉ. विशाखा शिरसाट, ॲड. नितीन पंडित, दुर्गा कल्याणी, प्रकाश घुगे, भाग्यश्री आव्हाड, प्रियांका कासार (वाघ), मंगेश पगार, मंगेश रोजेकर, मयूर मगर, महेश आव्हाड, महेश ढकोलिया, माधुरी पालवे, योगिता गायकवाड, योगेश देशमुख, राजाभाऊ पवार, राजेंद्र मोरे, राम कदम, राहुल बागूल, विक्रम कदम, संजय पितळे, संजय शिरसाट, संतोष क्षिरसागर, सतीश रत्नपारखी, सरस्वती भालेराव, सुनील भरमल, सूर्यभान घाडगे, स्वप्नील कासार, सीमा डावखर.

प्रभागाची व्याप्ती

आश्विन कॉलनी, जेतवननगर, मनोहरनगर, वास्तू पार्क, आडकेनगर परिसर, फर्नांडिसवाडी, मुक्तिधाम मंदिर, गायखे कॉलनी, घाडगेनगर, बिटको कॉलेज.

  • उत्तर - नाशिक- पुणे रस्त्यावरील मिलिटरी हद्दीपासून इच्छामणी चौक, पुणे रस्त्याने शिखरेवाडी ग्राउंड रस्त्यापर्यंत, शिखरेवाडी ग्राउंड रस्त्याने व नंतर एलआयसी रस्त्याने नाशिक- पुणे महामार्गापर्यंत पुढे महामार्गाचे हद्दीने बिटको चौकापर्यंत.

  • पूर्व - बिटको चौक ते मुक्तिधामपर्यंत.

  • दक्षिण - मुक्तिधामच दक्षिणेकडील रस्त्याने पश्चिमेकडे येऊन आनंदनगर रोड ते अंतर्गत रस्त्याने राजमाता आइस्क्रीम पार्लर पुढे तरण तलाव रस्त्याने श्री दुर्गामाता मंदिरापर्यंत, पुढे पूर्व, पश्चिमेकडे मेरी गोल्ड सोसायटीपर्यंत. आनंदनगर रस्त्याने जयभवानी रोडपर्यंत, तेथून पुढे मारवाड स्वीट्सपर्यंत, पश्चिमेकडे अंतर्गत रस्त्याने मिलिटरी हद्दीपर्यंत.

  • पश्चिम - मिलिटरी हद्दीलगत वासू पार्क गार्डन ते उत्तरेकडील रस्त्यापासून मिलिटरी हद्दीने नाशिक पुणे रस्त्यापर्यंत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()