नाशिक : गोदाकाठालगतचा पंचक गावठाण, नव्याने विकसित होणारी उपनगरे व दाट लोकवस्तीचा बालाजीनगर, मोरे मळा, पवारवाडी, भैरवनाथनगर, ढिकले नगर व शिवाजीनगरचा काही भाग असा ग्रामीण व शहरी मतदारांचा संमिश्र प्रभाग आहे. या प्रभागात उत्तर भारतीय मतदान परिणामकारक आहे. गेल्या पाच वर्षात विकासकामांच्या बाबतीत दुर्लक्षित असलेला गावठाण भाग, गोदा प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम व सुरक्षितता या बाबी मतदानात महत्त्वाच्या ठरतील.
भाजपकडे विकासकामांचा लेखाजोखा असला तरी शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने धनुष्य की मनुष्य, याला महत्त्व असेल. शिवसेनेची ताकद असली तरी आयात उमेदवारांमुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. वाढत्या इच्छुकांमुळे पॅचिंगचा प्रश्न सेनेच्या वरिष्ठांसमोर आहे. प्रभागातील नागरिकांशी दांडगा जनसंपर्क ही बाब महत्त्वाची ठरेल. विकासकामांमुळे मतदार विद्यमान नगरसेवकांची पाठराखण करतात का, नवीन चेहऱ्यांना संधी देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कोरोनाकाळात कोण किती कामाला आले, हा मुद्दा येथे महत्त्वाचा ठरेल. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दुर्लक्षून चालणार नाही. त्यामुळे तिरंगी लढतीच चित्र दिसेल.
प्रभागाची व्याप्ती ः पंचक गाव, दसक (भागशः), बोराडेनगर, विद्यानगरी, पवारवाडी, ढिकले मळा.
उत्तर ः गोदावरी नदी संत जनार्दन स्वामी पुलापासून गोदावरी नदीने पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन मनपा हद्दीपर्यंत.
पूर्व ः गोदावरी नदी गोदावरी नदी महापालिका हद्दीपासून दक्षिणेकडे महापालिका हद्दीने पश्चिमेकडील भाग घेऊन रेल्वे लाइनपर्यंत.
दक्षिण ः महापालिका हद्दीपासून रेल्वे लाइनने पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन दंडे रो-हाऊस घेऊन त्या शेजारील मरीमाता मंदिरापर्यंत, उत्तरेकडे कॅनॉल रोड ढिकले मळा चौकापर्यंत, कॅनॉल रोडने पश्चिमेकडे उत्तरे कडील भाग घेऊन आदित्य व्हिला बंगल्यापर्यंत, उत्तरेकडे पूर्वेकडील भाग घेऊन आदित्य व्हिला व अरिंगळे गोठा येथून जनेश्वर महादेव मंदिरासमोरील रस्त्याने उत्तरेकडे निकिता सोसायटीपर्यंत, पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन आरक्षण क्रमांक ३९५ च्या उत्तर हद्दीने व पुढे तुलसी पार्कमधील अंतर्गत रस्त्याने १२ मीटर डीपी रोडपर्यंत, पश्चिमेकडे हळदे यांचा बंगला घेऊन पुढे दिव्यस्वप्न इमारतीपर्यंत. दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन परेश सोसायटी इमारतीपर्यंत, पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन जेल रोडवरील मयुरेश सोसायटी घेऊन जेल रोडपर्यंत.
पश्चिम ः जेल रोडवरील मयुरेश सोसायटीने उत्तरेकडे जेलरोड पूर्वेकडील भाग घेऊन गोदावरी नदीवरील संत जनार्दन स्वामी पुलापर्यंत.
हे आहेत इच्छुक
रंजना बोराडे, शरद मोरे, विशाल संगमनेरे, अशोक सातभाई, रत्ना सातभाई, सुनील बोराडे, मीराबाई हांडगे, सचिन हांडगे, मंदा फड, राजेंद्र बोराडे, वंदना बोराडे, नंदकिशोर बोराडे, योगेश निसाळ, नितीन धानापुने, नीलेश पेखळे, नीलेश जगताप, राहुल तुपे, सुनीता निमसे, श्वेता तुपे-भालेराव, शिवा ताकाटे, शीतल ताकाटे, सागर भोजने, सुनीता भोजने, रंजन पगारे, कोमल जाधव, सुनंदा बोराडे, सुवर्णा लोळगे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.