Zika Virus : महापालिकेने लपविली ‘झिका’ रुग्णाची माहिती

Nashik News : महापालिका हद्दीमध्ये झिका रुग्ण येऊन उपचाराअंती निघून गेल्यानंतरही महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला याची माहिती नसल्याने याची दखल राज्याच्या आरोग्य विभागाने घेतली आहे.
Zika Virus
Zika Virusesakal
Updated on

Nashik News : महापालिका हद्दीमध्ये झिका रुग्ण येऊन उपचाराअंती निघून गेल्यानंतरही महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला याची माहिती नसल्याने याची दखल राज्याच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. पुणे शहरात झिका रुग्ण आढळला. त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेने खबरदारी घेण्यास सुरवात केली आहे. (Municipal Corporation hid information of Zika patients)

मात्र पुणे शहरात झिकाचा रुग्ण आढळण्याआधीच नाशिक शहरात झिकाचा संसर्ग झालेल्या रुग्णाचा प्रवेश झाला व उपचार घेऊन परतला. नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील एका ६६ वर्षीय पुरुष व्यक्तीला झिकाची लागण झाली होती. नाशिकमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार घेऊन संबंधित व्यक्ती घरी परतला. संबंधित रुग्णालयाने नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला कळविलेदेखील.

मात्र पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, राज्यात झिकाचा रुग्ण नाशिकमध्ये येऊन उपचार करून गेला असला तरी भीतीचे कुठलेही कारण नसल्याचे महापालिकेच्या वैयक्तिक विभागाकडून सांगण्यात आले. डेंगीप्रमाणेच झिका विषाणूंचा संसर्ग होतो. (latest marathi news)

Zika Virus
Nashik ZP News : जिल्हा परिषदेत 78 कर्मचाऱ्यांचे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र!

निरोगी व्यक्तीला झिका बाधित डास चावतो, त्या व्यक्तीला संसर्ग होतो. ताप येणे, त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यातील बुबुळाच्या भागांमध्ये जळजळ होणे, स्नायू दुखी, सांधे दुखी, अस्वस्थता व डोकेदुखी ही प्रमुख लक्षणे आहे.

दरम्यान, महापालिकेने झिकाचा रुग्ण शहरात दाखल झाल्याची कबुली दिली आहे. सदर रुग्ण हा संगमनेरचा होता. खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे डॉ. नितीन रावते यांनी सांगितले.

Zika Virus
Nashik ZP News : एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जिल्हा परिषदेची नोंद!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.