Nashik News : केंद्रीय गृहनिर्माण व शहरी मंत्रालयाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत २०२३-२४ वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या देशातील ३३ महापालिका व नगरपालिकांचा ‘स्पार्क अवॉर्ड-२०२४’ (सिस्टमैटीकल रिअल टाइम रैकिंग) देवून गौरव करण्यात आला. यात नाशिक महापालिकेलादेखील स्पार्क पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Municipal Corporation honored with Spark Award by Centre)
पुरस्कार प्राप्त यादीत महापालिका दहा लाख लोकसंख्येपेक्षा मोठ्या महापालिका गटात देशात तिसऱ्या स्थानी आहे. दिल्ली येथे गुरुवारी (ता. १८) पुरस्काराचे वितरण करण्यात आले. इंडिया हॅबिटॅट सेंटर स्टीन ऑडिटोरियम येथे केंद्रीय गृहनिर्माण व शहरी मंत्री मनोहर लाल, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी राज्यमंत्री तोखन साहू यांच्या हस्ते महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी पुरस्कार स्वीकारला.
उपायुक्त अजित निकत, शहर अभियान व्यवस्थापक पल्लवी वक्ते व रंजना शिंदे यांचाही सन्मान करण्यात आला. अभियानांतर्गत १ हजार ८३६ महिला बचतगट तयार करण्यात आले. यात १६०१ लाभार्थ्यांना कर्ज देण्यात आले. त्याचप्रमाणे १२ हजार २३२ लाभार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले. (latest marathi news)
बेघर व्यक्तींसाठी दोन बेघर निवारे उभारण्यात आले. पीएम स्वनिधी योजनेंतर्गत महापालिकेला २९, ७२१ उद्दिष्ट प्राप्त होते. या अनुषंगाने ४०, ७५५ (१३७ टक्के) पथविक्रेत्यांनी योजनेसाठी बँकेकडे ऑनलाइन अर्ज केले आहे. बँकांनी ३८, २२८(१२८ टक्के) कर्ज मंजूर केले. त्यापैकी ३७, ००७ (१२५ टक्के) पथविक्रेत्यांना कर्ज आतापर्यंत वितरित करण्यात आले.
पुरस्काराबद्दल आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी अभिनंदन केले. पुरस्कार सोहळ्यास केंद्रीय नगर विकास विभागाचे सचिव अनुराग जैन, केंद्रीय संचालक राहुल कपूर, संचालक मनोज रानडे, नगरविकास विभागाच्या उपसचिव सुशीला पवार, सहआयुक्त शंकर गोरे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.