तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नाशिक महापालिका सज्ज

nashik municipal corporation
nashik municipal corporatione-sakal
Updated on
Summary

कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असताना आता तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले बाधित होणार नाही, यासाठी पालकांनी सजग राहावे असे आवाहन महापौर सतीश कुलकर्णी यांनी केले आहे.

नाशिक : कोरोनाची (coronavirus) दुसरी लाट नियंत्रणात येत असताना आता तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले बाधित होणार नाही, यासाठी पालकांनी सजग राहावे असे आवाहन महापौर सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) यांनी केले आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर महापौर कुलकर्णी यांनी बालरोग तज्ज्ञांची ऑनलाइन बैठक बोलाविली होती. (nashik municipal corporation is preparing to face the third wave of coronavirus)

या वेळी ते म्हणाले, कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याची शक्यता आहे. त्यासाठी महापालिकेकडून यंत्रणा उभारली जात आहे. परंतु, त्यापूर्वी लहान मुले कोरोनाबाधित होऊ नये यासाठी पालकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहे. शैक्षणिक संस्थामध्ये जनजागृती केली जाणार आहे. महापालिकेकडून विविध पातळ्यांवर काम करून पुरेसा औषधसाठा, बालकांसाठी कोविड सेंटर, अशी व्यवस्थादेखील केली जाणार असल्याची माहिती महापौर कुलकर्णी यांनी दिली.

नाशिकमध्ये आढळली तिसरी प्राचीन बुद्ध लेणी!

बालरोग तज्ज्ञांनी विविध मुद्दे मांडले. त्यात बालकांच्या पालकांची कोरोनाबाबत जनजागृती करणे, बालकांना उद्भवणारी लक्षणे, बालकांसाठी नियमावली तयार करणे, स्वतंत्र हेल्पलाइन तयार करणे, प्राथमिक लक्षणांची माहिती जनजागृतीद्वारे पालकांना दिल्यास मार्गदर्शन करणे, लसीकरणाची गती वाढविणे, बालकांसाठी औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करणे, बालरोगतज्ञ व त्या आनुषंगिक रुग्णसेवक उपलब्धतेबाबत नियोजन करणे, कोरोनाबाधित रुग्णांसाठी व्यवस्था करत असताना दोन पद्धतीने विभागणी करून नॉन कोविड व कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे, नवजात बालकांना कोरोनाचा धोका निर्माण होऊ नये याबाबत नियोजन करणे, व्हेंटिलेटरची व्यवस्था करणे आदी मुद्दे मांडले. वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी लहान मुलांवर उपचारासाठी रुग्ण सेवकांना प्रशिक्षण देण्याचे आवाहन केले. ऑनलाइन बैठकीत आयएमएचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस, सचिव कविता गाडेकर, बालरोगतज्ञ अध्यक्ष डॉ. रवींद्र सोनवणे, सेक्रेटरी डॉ. रीना राठी, डॉ. रमाकांत पाटील, डॉ. मिलिंद भराडीया, डॉ. सागर सोनवणे, डॉ. संजय आहेर, डॉ. नितीन सुराणा, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. श्रेयस गायधनी, डॉ. अमोल कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला.

nashik municipal corporation
तो आला अन्‌ एक लाख रुपये देऊन गेला!

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज असून पालकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी, त्यासाठी महापालिकेकडून व्यापक प्रमाणात जनजागृती अभियान राबविले जाईल.

- सतीश कुलकर्णी, महापौर, नाशिक.

(nashik municipal corporation is preparing to face the third wave of coronavirus)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.