Nashik NMC : पूर्णत्वाच्या दाखल्यानंतर आता 15 दिवसात घरपट्टी; जन्म-मृत्यूचा दाखल्याची प्रत 3 दिवसात

Nashik News : लोकसेवा हक्क अध्यादेशानुसार नागरिकांना सेवा पुरविली जाते. त्यानुसार महापालिकेने आता विहित नमुन्यात अर्ज दाखल केल्यास जन्म- मृत्यूचा दाखल्याची प्रत तीन दिवसात मिळणार आहे.
NMC Nashik
NMC Nashik esakal
Updated on

Nashik News : लोकसेवा हक्क अध्यादेशानुसार नागरिकांना सेवा पुरविली जाते. त्यानुसार महापालिकेने आता विहित नमुन्यात अर्ज दाखल केल्यास जन्म- मृत्यूचा दाखल्याची प्रत तीन दिवसात मिळणार आहे. त्याचबरोबर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर पंधरा दिवसात घरपट्टी लागू केली जाणार आहे. महापालिकेने अधिसूचित सेवांचा कालावधी निश्चित केला आहे. (Nashik NMC)

त्यानुसार ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. स्थानिक प्रशासनाकडून राज्यातील पात्र व्यक्तींना कार्यक्षम पारदर्शक व समायोजित लोकसेवा देणे बंधनकारक आहे. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क २०१५ लागू करण्यात आला आहे. या अध्यदेशामधील कलम तीननुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने अध्यादेश लागू झाल्यानंतर तीन महिन्यात व त्यानंतर वेळोवेळी पूर्वीच असलेल्या लोकसेवा लोकसेवेसाठी कालमर्यादा निश्चित केली आहे.

७ जुलै २०१५ ला त्यानुसार अध्यादेश काढला आहे. महापालिका क्षेत्रात तत्पर व दर्जेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून १५ लोकसेवा नियमात नमूद केल्या आहेत. ४ सप्टेंबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार मालमत्ता करा संदर्भातील बारा सेवा, पाणीपुरवठा वसुली संदर्भातील १४ सेवा, न हरकत प्रमाणपत्र संदर्भात दोन सेवा, व्यवसाय परवाना संदर्भात दहा सेवा अधिसूचित केल्या आहेत.

त्यानुसार जन्म मृत्यू व विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता कर उतारा व थकबाकी नसल्याचा दाखला तीन दिवसात मिळणे बंधनकारक करण्यात आले आहे. मालमत्ता हस्तांतर नोंद प्रमाणपत्र व वारसा हक्काने हस्तांतर नोंद प्रमाणपत्राकरिता पंधरा दिवस, तर झोन दाखल्यासाठी सात दिवस काल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. (latest marathi news)

NMC Nashik
Nashik ZP News : सुपर फिफ्टीच्या निधीसाठी ‘नियोजन’ला साकडे; जिल्हा परिषद प्रशासनाकडून 2 कोटींची मागणी

बांधकाम परवानगीकरिता दोन महिने, जोती प्रमाणपत्रासाठी पंधरा दिवस, तर भाग नकाशासाठी तीन दिवस व भोगवटा प्रमाणपत्रासाठी एक महिन्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. नळ व मलनिस्सारण जोडणीसाठी पंधरा दिवस निश्चित करण्यात आले आहे. अग्निशामक ना हरकत दाखला सात दिवस, तर अग्निशामक अंतिम ना- हरकत दाखला पंधरा दिवसात देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या सेवा पंधरा दिवसात बंधनकारक

बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर नागरिकांना घरपट्टी लागू होत नाही. त्यामुळे बोजा चढण्याची भीती असते म्हणून नवीन मिळकतीत वर अर्ज दाखल केल्यानंतर पंधरा दिवसात घरपट्टी लागू केली जाणार आहे. त्याचबरोबर मालमत्ता पाडणे व पुनर्बांधणी कर आकारणीसाठी पंधरा दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

NMC Nashik
Nashik ZP News : शिष्यवृत्तीचा टक्का वाढीसाठी शिक्षण विभाग सरसावला; जिल्हा परिषद शाळांमध्ये आतापासूनच घेणार सराव परीक्षा

थकबाकी नसल्याचा दाखला, मालमत्ता कर उतारा या सेवा तीन दिवसात देणे बंधनकारक आहे. नळजोडणी व आकारात बदल करायचा असल्यास त्या सेवादेखील पंधरा दिवसात देणे बंधनकारक आहे. महापालिका हद्दीमध्ये व्यवसाय करण्यासाठी परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. परवान्याचे नूतनीकरण व परवाना हस्तांतर व व्यवसायाचे नाव बदलणे असो किंवा भागीदारांचे नाव बदलणे किंवा भागीदारांसंदर्भातील बदल असो त्यासाठीदेखील पंधरा दिवसांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

मंडप उभारणीसाठी प्रमाणपत्र

महापालिका हद्दीमध्ये रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारणीसाठी ना- हरकत प्रमाणपत्र सात दिवसात देणे बंधनकारक असून, संबंधितांना प्रमाणपत्र घेणेदेखील बंधनकारक करण्यात आले आहे.

NMC Nashik
Nashik Kharif Season : खरिपामुळे शेतशिवार हिरवीगार; पावसाळी कांद्यासाठी जमीन रिक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.