Namami Goda Project : नमामि गंगेच्या धर्तीवर ‘नमामि गोदा’ प्रकल्प उभारण्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून काम करणाऱ्या नाशिक महापालिकेला दिल्लीच्या बैठकीत मोठा झटका बसला आहे. नमामि गोदा प्रकल्पाचाच विचार करायचा तर संगम ते विलीनीकरणापर्यंतचा विचार का नाही केला? अशी विचारणा करताना महापालिकाच नव्हे, तर राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागासह अन्य शासकीय विभागालाही सामावून घेण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. (Municipal Corporation worried regarding Namami Goda project )