Nashik News : मनपा विभागीय कार्यालय अभ्यासिका अनेक वर्षापासून बंद!

Latest Nashik News : मनपा विभागीय कार्यालय अभ्यासिका अनेक वर्षापासून बंद असल्याने स्पर्धा परीक्षा, बँकिग परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
municipal divisional office cidco nashik
municipal divisional office cidco nashikesakal
Updated on

Nashik News : सिडको परिसरात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या अनेक तरुण, तरूणी सुसज्ज अशी अभ्यासिका उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना शहरातील अभ्यासिकांमध्ये जाण्यास भाग पडते. यातच मनपा विभागीय कार्यालय अभ्यासिका अनेक वर्षापासून बंद असल्याने स्पर्धा परीक्षा, बँकिग परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. (Municipal Divisional Office library closed)

महाविद्यालयीन जीवन पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी खासगी क्लासेस करून अधिकारी होण्याची स्वप्न बघतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना घरी राहून अभ्यास करत तयारी करणे शक्य होत नाही. सर्वच विद्यार्थ्यांना दिल्ली, पुणे सारख्या मोठ्या शहरात जाऊन अभ्यास करणे, क्लास लावणे शक्य नसते. त्यामुळे आपल्याच शहरात राहून अभ्यास करण्यास अनेक विद्यार्थी पसंती दर्शवितात.

त्यासाठी आपल्या परिसरातील अभ्यासिकेत प्रवेश घेत अनेक विद्यार्थी अभ्यास करतात. शहरासह सिडको परिसरात देखील मोठ्या संख्येने विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा तयारी करत आहे. परंतु सुसज्ज आणि अनुकूल वातावरणातील अभ्यासिकांचा सिडको परिसरात अभाव असल्यामुळे त्याचा कुठलाही प्रकारचा फायदा विद्यार्थी वर्गाला होत नाही.

अंबड पोलिस स्टेशन जवळ नवीन नाशिक महापालिकेच्या विभागीय कार्यालयात असलेली श्री शिवछत्रपती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ अभ्यासिका अनेक वर्षांपासून बंद झालेली आहे. त्यामुळे नाहक विद्यार्थ्यांना नाहक लांबच्या आणि खासगी अभ्यासिकांचा पर्याय शोधावा लागत आहे. (latest marathi news)

municipal divisional office cidco nashik
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का, भाजपने फोडली अजित पवारांची राष्ट्रवादी, 'हा' आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश!

सिंहस्थनगरला अपुरी जागा

सिंहस्थनगर येथील स्वामी विवेकानंद तरण तलाव येथील अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना जागा कमी पडत असल्याने अनेक विद्यार्थी दुसऱ्या अभ्यासिकेत जात आहे. त्यामुळे महापालिकेने मनपा कार्यालयातील सुसज्ज अभ्यासिका पुन्हा सुरु करावी अशी मागणी विद्यार्थी करत आहे.

"अनेक वेळा खासगी अभ्यासिकेत प्रवेश घेतल्यानंतर तेथील प्रवेश फी तसेच मासिक फी मोठ्या प्रमाणात घेतली जाते. त्यामुळे त्याचा फार मोठ्या प्रमाणात कुटुंबावर आर्थिक भार पडत असतो." - रमेश कचरे, विद्यार्थी

"दिल्ली, पुणे या ठिकाणी जाऊन स्वतः अभ्यास करण्यासाठी आर्थिक खर्च परवडणारा नाही, त्यामुळे नाशिकमध्ये अभ्यास करण्याचा निर्णय घेतल्यावर सिडको परिसरात सुसज्ज अभ्यासिकांची कमतरता असल्यामुळे महापालिकेने चांगली अभ्यासिका उपलब्ध करून द्यावी."

- किरण बोरसे, विद्यार्थिनी

"अनेक वेळा अव्वाच्यासव्वा दरात खासगी अभ्यासिकेवाले पैसे आकारत असतात आणि हव्या तशा सुविधाही देत नाहीत. त्यामुळे अनेक वेळा अभ्यासाची परवड होते. महापालिकेची अभ्यासिका पूर्ववत सुरू करावी."- गोकूळ निकम, विद्यार्थ

municipal divisional office cidco nashik
Sharad Pawar: बालेकिल्ल्यावर पवार मिळवणार पुन्हा विजय? राजन पाटलांनंतर, आमदार बबन शिंदे दुसऱ्यांदा शरद पवार यांच्या भेटीला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.