आप्पांच्या "गुगली" ने शिवसेनेत रंगल्या राजकीय "गप्पा" !

shivaji chumbhale
shivaji chumbhaleesakal
Updated on

सिडको (जि.नाशिक) : नाशिक महापालिका (NMC) निवडणुकीच्या ऐन तोंडावर कोण, काय, केव्हा आणि कशी ‘गुगली’(Googly) टाकेल त्याचा काही नेम नाही. अशाच एका नाशिकच्या राजकीय मातब्बर व्यक्तिमत्त्व म्हणून गणल्या जाणाऱ्या ‘अप्पा’ नी टाकलेल्या गुगलीमुळे शिवसेनेत काही काळ अस्वस्थता निर्माण झाल्याच्या राजकीय गप्पा आता रंगल्याचे ऐकला मिळत आहे.

shivaji chumbhale
Aurangabad Politics| औरंगाबादेत भाजपचे मलिकांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन

तीन वेळा नगरसेवक, स्थायी समिती सभापती, बाजार समितीचे सभापतिपद शिवाजी चुंभळे(Shivaji Chumbhale) यांनी सांभाळले आहे. कल्पना चुंभळे या मागील दोन पंचवार्षिक पासून सातत्याने नगरसेविका आहेत, तर अजिंक्य चुंभळे गौळाणेचे सरपंच व युवा सेनेचे राज्य विस्तार म्हणून काम बघत आहेत. एवढी मोठी राजकीय पार्श्वभूमी असतानादेखील शिवसेना (Shivsena) पक्षाने मात्र त्यांना फारसे काही राजकीय महत्त्व दिले नसल्याचे आतापर्यंत प्रकर्षाने जाणवत असल्याने ते अदखल पात्र ठरत आहे. बाजार समिती प्रकरणात अडचणीत सापडलेले असताना त्यांना कुठल्याही प्रकारची न केलेली मदत, दोन वेळा नगरसेविका होऊनही कल्पना चुंभळे यांना महापालिकेत पाहिजेत तसे फारसे न दिलेले महत्त्व हे तसे बोचण्यासरखेच आहे म्हणा. वास्तविक पाहता पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) घट्ट असलेल्या मैत्रीची साथ सोडून त्यांनी शिवसेनेच्या भरवशावर प्रवेश केला होता. असे असतानादेखील पक्षाने त्यांना नेहमीच अडगळीत टाकण्याचे काम आतापर्यंत केले आहे. त्यामुळेच की काय आज त्यांची जी काही ओळख निर्माण झाली आहे. ती पक्ष म्हणून नसून तर चुंभळे म्हणून असल्याचे प्रकर्षाने जाणवते हे मात्र तेवढं खरं.

shivaji chumbhale
Political News : अवघ्या 40 दिवसांत दुसऱ्यांदा भाजपात प्रवेश

अनेकांच्या भुवया उंचावल्या

भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नाशिक दौऱ्यावर आले असता शिवाजी चुंभळे यांनी भाजप (BJP) आयोजित कार्यक्रमाच्या स्टेजवर जात त्यांना हार घालून स्वागत केले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर शिवसेनेच्या गोटात मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. कदाचित अप्पांनी आतापर्यंतची मनातील खदखद या निमित्ताने व्यक्त केल्याचे बोलले जात असून शिवसेनेसाठी ती ‘वॉर्निंग बेल’ (Warning Bell) च म्हणावी म्हणावी की काय ? असा प्रश्न आता चर्चिला जात आहे.

shivaji chumbhale
आमदार सावंतांच्या पॅनला धक्का; सोसायटी निवडणुकीत 'NCP'चा झेंडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.