Nashik News : धोकादायक 73 घरांना महापालिकेच्या नोटिसा; खबरदारीचा उपाय म्हणून घरे खाली करण्याच्या सूचना

Nashik : ७३ धोकादायक घरांना महापालिकेने नोटिसा देत घरे खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Dangerous houses in Deolali village here.
Dangerous houses in Deolali village here.esakal
Updated on

Nashik News : येथील ७३ धोकादायक घरांना महापालिकेने नोटिसा देत घरे खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाशिक महानगरपालिकेने नुकताच धोकादायक घरांचा सर्वे करून या नोटीस जारी केल्या आहेत. अति धोकादायक वाडे, घरे खाली करण्याचे आवाहन नाशिक महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी चंदन घुगे यांनी केले आहे. नाशिक रोडला जुने पुरातन वाडे आहेत, विशेष करून विहीतगाव आणि देवळाली गावात अशा धोकादायक घरांचे प्रमाण जास्त आहे. (Municipal notices to 73 dangerous houses )

मातीची कौलारू शेणाने सारवलेली घरे देवळाली गावात जास्त आहेत. त्यामुळे अशा धोकादायक घरांचा सर्वे करून नाशिक महानगरपालिकेने घरे खाली करण्याचे आवाहन केले आहे. सध्या पावसाळा सुरू आहे, त्यामुळे घरे कोलमडणे, पडणे, भिंती कोसळणे असे प्रकार घडून जीव व वित्त हानी होऊ शकते. अनेकवेळा घर पडल्यावर रात्रीच्या वेळी नागरिकांना जीव गमवावा लागतो. (latest marathi news)

Dangerous houses in Deolali village here.
Nashik News : प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ड्रंक ॲण्ड ड्राईव्हवर कारवाई सुरू!

त्यामुळे धोका टाळण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने धोकादायक घरांना नोटिसा जारी केल्या आहेत. तर काही घरांमध्ये पोट भाडेकरू आहेत. हे भाडेकरू अनेक वर्षांपासून या ठिकाणी राहतात, त्यामुळे घरातील संसार कुठे स्थलांतरित करायचा, असा प्रश्न काही रहिवाशांना पडला आहे. पावसाळा असल्याने महानगरपालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून ७३ घरांतील नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.

''नाशिक रोड येथील विशेष करून विहीतगाव आणि देवळाली गाव येथील धोकादायक घरे आहेत. अशा घरांना आम्ही नोटिसा दिल्या आहेत. नागरिकांनी सुरक्षित राहावे सध्या पावसाळा आहे. त्यामुळे धोकादायक घरे कधीही कोलमडू शकतात.''- चंदन घुगे, नाशिक रोड महापालिका विभागीय अधिकारी

Dangerous houses in Deolali village here.
Nashik News : माजी आमदार अपूर्व हिरेंच्या बॅनर्सचा विरोधकांना धसका; वाढदिवसानिमित्त चौकाचौकात शुभेच्छा फलक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.