Nashik NMC : पावसाळ्यापूर्वी जुन्या इमारतींचे संरचनात्मक लेखापरिक्षण!

Nashik News : नाशिक महापालिकेला जीवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने धोकादायक स्थितीत असलेल्या जुन्या इमारतींचे संरचनात्मक लेखा परीक्षण अर्थात स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
old buildings before monsoon Structural audit
old buildings before monsoon Structural auditesakal
Updated on

Nashik News : घाटकोपर येथे वादळी पावसामुळे होर्डिंग पडण्याची घटना, गुजरातमधील गेम झोनला लागलेली आग, त्याचप्रमाणे पावसाळ्यात जुने घर कोसळण्याचे वाढते प्रकार लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक महापालिकेला जीवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने धोकादायक स्थितीत असलेल्या जुन्या इमारतींचे संरचनात्मक लेखा परीक्षण अर्थात स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. (old buildings before monsoon Structural audit)

महापालिकेच्या पॅनलवरील तज्ज्ञ अभियंत्यांकडून व महापालिकेच्या निधीतून ही कामे पूर्ण करून घ्यावी. पावसाळ्यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये जीवित व वित्तहानी घटनांमध्ये वाढ झाली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील महापालिका आयुक्तांची बैठक घेतली.

महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर हेदेखील ऑनलाइन बैठकीत सहभागी झाले होते. नाशिक शहरामध्ये जवळपास १०७७ धोकादायक वाडे व इमारती आहे. पश्चिम विभागात ६००, पंचवटी विभागात १९८, पूर्व विभागात ११७, नाशिक रोड विभागात ६९, सातपूर विभागात ६८, सिडको विभागात २५ याप्रमाणे धोकादायक घरे व वाढे आहेत.

त्याचबरोबर ४० वर्षे जुन्या झालेल्या इमारतींची संख्यादेखील सातत्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेला विशेष सूचना दिल्या आहेत. जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारती, तसेच ४० वर्ष जुन्या झालेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याच्या स्पष्ट सूचना आहे. (latest marathi news)

old buildings before monsoon Structural audit
Nashik Traffic Problem : शरणपूर रोड ‘वन-वे’वर दुहेरी वाहतुकीमुळे कोंडी; फलक लावूनही वाहनचालकांकडून सर्रास घुसखोरी

महापालिका आयुक्तांनी तातडीने सदर बाब लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभागाला स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने पावसाळ्यापूर्वी जुन्या इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाला सूचना

- नालेसफाई कामे व गाळ काढण्याची कामे पूर्ण करावी.

- मलनिस्सारण वाहिन्या व चेंबर सफाई.

- खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती.

- वृक्ष छाटणी व धोकादायक वृक्ष व फांदी छाटणी काल मर्यादित पूर्ण करावी.

- पाणी तुंबणारे ठिकाणे निश्चित करून दुरुस्ती.

- पूर नियोजनाच्या अनुषंगाने नियोजन.

- प्रस्ताव गटारीच्या कडेचे डेब्रिज साफ करावे.

- दराडे कोसळण्यासाठी संरक्षण भिंत बांधावी.

काझी गढी धोकादायक

दरडी किंवा मातीचे ढिगारे कोसळण्याच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने ढासळणाऱ्या काझी गढीकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. पावसाळा आल्यानंतर फक्त नोटिसा व तातडीची उपाययोजना म्हणून काझी गढीवासीयांना समाजमंदिरांमध्ये स्थलांतरित करण्याच्या उपाययोजना केल्या जातात.

old buildings before monsoon Structural audit
Nashik Teachers Constituency : शिक्षक मतदारसंघात साडेसोळा हजार मतदारांची भर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.