Nashik News: प्रधान सचिवांच्या शाळेत मनपा अधिकारी वर्ग नापास! वयोश्री, युवा कार्य प्रशिक्षण, लाडकी बहिण योजनेबद्दल अपूर्ण माहिती

Nashik News : राज्याचे नगर विकास प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांनी शुक्रवारी (ता.२) सिडको मनपा विभागीय कार्यालयाला भेट दिली.
During the meeting Asim Kumar Gupta, Ashok Karanjkar, Swati Bhadane, Harshal Baviskar, Nitin Ner, Khadke, Mayur Patil, Sunita Kumawat etc.
During the meeting Asim Kumar Gupta, Ashok Karanjkar, Swati Bhadane, Harshal Baviskar, Nitin Ner, Khadke, Mayur Patil, Sunita Kumawat etc.esakal
Updated on

सिडको : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची सर्वत्र चर्चा होत असताना राज्याचे प्रधान सचिव यांनी या योजनेबाबत सिडको मनपा विभागीय कार्यालयात अचानक घेतलेल्या कार्यशाळेत अधिकारी वर्ग नापास झाल्याचे बघायला मिळाले. यावेळी सचिवांनी काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली. (Municipal Officer class failed in Principal Secretary school)

राज्याचे नगर विकास प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांनी शुक्रवारी (ता.२) सिडको मनपा विभागीय कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी वयोश्री, युवा कार्य प्रशिक्षण योजना, माझी लाडकी योजनेबद्दल उपस्थित मनपा आयुक्त, उपयुक्त व अधिकारी वर्गाला विचारणा केली.

मात्र अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने प्रधान सचिवांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली. त्यावेळेस त्यांनी सज्जड इशारा देत संबंधितांनी या योजनेचा लाभ शेवटच्या तळागाळातील महिलेपर्यंत पोचवला पाहिजे, असे सांगितले. (latest marathi news)

During the meeting Asim Kumar Gupta, Ashok Karanjkar, Swati Bhadane, Harshal Baviskar, Nitin Ner, Khadke, Mayur Patil, Sunita Kumawat etc.
Nashik MP Rajabhau waje: संसदेत नाशिकच्या आरोग्याचा प्रश्न खासदार वाजे यांनी मांडला इंग्रजीत!

अधिकारी वर्गाची तारांबळ

नगर विकास सचिव गुप्ता यांनी सिडको विभागीय कार्यालयाला भेट दिली असता मोठ्या गमती जमती बघायला मिळाल्या. मनपा अधिकारी वर्गाची चांगली तारांबळ उडाली. मनपा अधिकाऱ्यांनी दूरध्वनीवर बोलणे पसंत केले. बऱ्याच जणांना योजनेबद्दल माहिती देता आली नाही. त्यावेळी अधिकारी वर्गाचे चेहरे बघण्यासारखे होते.

तर एक अधिकारी मोबाईल चार्जिंगमध्ये व्यस्त होता. दुसरा एक अधिकारी बैठकीला बसण्याच्या धाकाने दारातच उभा होता. तर तिसऱ्या एका अधिकाऱ्याने सचिव येणार म्हणून अगोदरच पळ काढला. विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे दिसून आले. तर मोठ्या पदाचे एक अधिकारी काजू खाताना दिसून आले.

During the meeting Asim Kumar Gupta, Ashok Karanjkar, Swati Bhadane, Harshal Baviskar, Nitin Ner, Khadke, Mayur Patil, Sunita Kumawat etc.
Dada Bhuse News : ‘किकवी’ धरणाचा प्रश्‍न मंत्रिमंडळाच्या बैठकीतून सोडवणार : दादा भुसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.