Nashik NMC News : पावसाळा आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज

Nashik News : महापालिकेने यंदाही आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. आराखड्यात विभागनिहाय कामांची जबाबदारी निश्चित केली आहे.
monsoon disaster management (file photo)
monsoon disaster management (file photo)esakal
Updated on

Nashik News : यंदा पावसाची हजेरी दमदार राहणार असल्याने नद्या, नाल्यांना पूरही येण्याची शक्यता आहे. त्यापार्श्‍वभूमीवर महापालिकेने सज्जता केली असून आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. आपत्कालीन कक्षात चोवीस तास कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्याबरोबरच गंगेवर पट्टीच्या पोहणाऱ्यांची नियुक्ती केली आहे. (Municipal ready for monsoon disaster management)

कामात हलगर्जीपणा, विलंब व टाळाटाळ आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. पावसाळ्यात वादळी पावसात झाडे, जुनी घरे, वाडे कोसळून गटारी तुंबणे, रस्त्यावर पाणी साचणे, पथदीप बंद पडणे, दूषित पाणी पुरवठा, नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतरण यासारख्या घटना घडतात. त्यामुळे राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून कक्ष स्थापन करण्याची जबाबदारी निश्चित केली आहे.

त्यानुसार महापालिकेने यंदाही आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. आराखड्यात विभागनिहाय कामांची जबाबदारी निश्चित केली आहे. आपत्ती निवारणात अग्निशमन विभागाकडे प्रमुख जबाबदारी दिली आहे. घटनास्थळी बचाव कार्यासाठी कर्मचारी नियुक्त करणे, अग्निशमन बंबासह इमर्जन्सी रेस्क्यू व्हॅन उपलब्ध करून देणे.

झाडांचा अडथळा दूर करणे, पूर परिस्थितीत जीवरक्षक तसेच यंत्रे सज्ज ठेवण्याची जबाबदारी या विभागाकडे आहे. पालिकेच्या राजीव गांधी भवनमध्ये आपत्ती निवारण कक्ष स्थापन होणार असून हा कक्ष २४ तास खुला राहणार आहे. कक्षात कामासाठी तीन सत्रांत अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. (latest marathi news)

monsoon disaster management (file photo)
Nashik Dengue Update : जिल्ह्यात 99 रुग्णांना डेंगीची लागण; ग्रामीण भागातही प्रादुर्भाव

अशी आहे जबाबदारी

- प्रशासन-जिल्हा व राज्य आपत्ती निवारण कक्षाशी समन्वय.

- अतिक्रमण निर्मूलन- आपत्तीत मनुष्यबळ, यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे.

- जनसंपर्क- स्थलांतरित नागरिकांची निवारा व्यवस्था.

- बांधकाम- नुकसान मोजणे, पाण्याचा निचरा, रस्ते, गटारी दुरुस्ती.

- पाणी पुरवठा- आपत्कालीन कक्ष- वाढत्या पाण्याची पातळी कळविणे.

- मलनिस्सारण- तुंबलेल्या भूमिगत, पावसाळी गटारी दुरुस्ती.

- घनकचरा व्यवस्थापन- रस्त्या, नदीकाठचा कचरा हटविणे.

मुख्यमंत्र्यांची आज व्हीडीओ कॉन्फरन्स

नाशिक महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलाविली होती. परंतु तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आली. आता मंगळवारी (ता.२८) आढावा घेतला जाणार आहे.

monsoon disaster management (file photo)
Nashik ZP News : चुकीचे कामकाज करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; विविध विभागांतील 5 जणांचे निलंबन

आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाचे

- महापालिका मुख्यालयात आपत्कालीन कक्ष स्थापन करणे.

- कक्षासाठी मनुष्यबळ व यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे.

- स्थलांतरित नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात निवारा उपलब्ध करून देणे.

- पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांची खोदाई बंद करणे.

- धोकादायक घरांचा भाग उतरवून घेणे.

- दूषित पाणीपुरवठा टाळणे.

- काझी गढी मिळकत धारकांना नोटिसा बजावणे.

- रुग्णवाहिका शववाहिका तयार ठेवणे.

- रुग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध करून देणे.

- पावसाळी व पाण्याची गटारे तसेच शंभर व पाइपलाइन स्वच्छ करणे.

- गटारीमधून निघालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे.

- मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी अभियंत्यांची नियुक्ती.

- पावसाच्या पाण्याचा निचरा करणे.

monsoon disaster management (file photo)
Nashik Summer Heat : 5 दिवसांत तापमान 6 अंशांनी घसरले! उकाडा कायम, किमान तापमानात 2 अंशांनी घट

- खराब रस्ते दुरुस्ती व पाइपलाइन गटारींची दुरुस्ती करणे.

- धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची पातळी नियंत्रित ठेवणे.

- फुटलेल्या जलवाहिन्या दुरुस्त करणे.

- २४ तास आपत्कालीन पथके सज्ज ठेवणे.

- मॅन होल बंद करणे, ड्रेनेज चोकअप काढणे.

- बाधित भागातील वीज पुरवठा बंद करणे.

- महापालिकेचे धोकादायक विद्युत पोल हटविणे.

- कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घंटागाड्या नियमित सुरू ठेवणे.

- पूर ओसरल्यानंतर रस्त्यावरील व नदी काठावरील वाहून आलेला कचरा हटविणे.

- बाधित व्यक्तींची ओळख पटविणे.

- सेवाभावी संस्थांची यादी तयार करणे.

- साथीचे रोग पसरू नये, यासाठी औषध फवारणी करणे.

- रस्त्यावर पडलेले झाड त्वरित उचलणे.

- बाधित ठिकाणी नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे.

- चेंगराचेंगरी व अफवांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करणे.

- आवश्‍यक त्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करणे.

- तळघरातील पाणी काढण्यासाठी पोर्टेबल पंप उपलब्ध करणे.

"आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा, विलंब किंवा टाळाटाळ केल्याचे आढळल्यास कारवाई होणार आहे." -स्मिता झगडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

monsoon disaster management (file photo)
Nashik Goda Ghat : पर्यटकांना भिकाऱ्यांमुळे ओंगळवाणे दर्शन; गोदाघाटावरील महापालिकेचे निवाराशेड रिकामेच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.