Nashik News : मुस्लिम पालकांचा गणवेश योजनेला विरोध! भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे शिक्षणमंत्र्यांना साकडे

Latest Nashik News : जिल्ह्यातील उर्दू शाळांतील विद्यार्थ्यांना जुन्या पद्धतीने गणवेश मिळावेत, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षण संचालक यांच्याकडे केली आहे.
Sajid Ahmed giving a statement to Education Minister Deepak Kesarkar demanding uniforms for students in Urdu schools as before.
Sajid Ahmed giving a statement to Education Minister Deepak Kesarkar demanding uniforms for students in Urdu schools as before.esakal
Updated on

नामपूर : समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना दोन नवीन गणवेश दिले जातात. परंतु यंदा शाळा सुरू झाल्यानंतर साडे तीन महिन्यानंतर एक गणवेश विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यातच पेहरावात बदल केल्याने मुस्लिम पालकांनी मोफत गणवेश योजनेला विरोध केल्याने गणवेश स्वीकारण्यास शाळा व्यवस्थापन समित्यांनी नकार दिला आहे.

जिल्ह्यातील उर्दू शाळांतील विद्यार्थ्यांना जुन्या पद्धतीने गणवेश मिळावेत, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षण संचालक यांच्याकडे केली आहे. (Muslim parents oppose school uniform scheme)

शासनाच्या निर्देशानुसार शालेय गणवेशाचे कापड महिला आर्थिक विकास महामंडळाला प्राप्त झाल्यानंतर बचत गटांमार्फत गणवेश तयार करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना एक गणवेश महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांद्वारे दिला जाईल, दुसऱ्या गणवेशाचे कापड शाळांना दिले जाणार असून, अद्यापही त्याबाबत तर काहीच हालचाल झालेली नाही. विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश कधी मिळणार, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. (latest marathi news)

Sajid Ahmed giving a statement to Education Minister Deepak Kesarkar demanding uniforms for students in Urdu schools as before.
Nashik News: सरपंच-उपसरपंचांना निवडणुकीपूर्वीच गिफ्ट! मानधन वाढीमुळे जिल्ह्यातील गावकारभाऱ्यांना मिळणार सुमारे दीड कोटी

"उर्दू शाळांतील विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे फूल पॅन्ट, सलवार, स्कार्फ मिळायला हवे. राज्यातील उर्दू माध्यमाच्या शाळांनी समग्र शिक्षा अभियानाच्या यंदाच्या गणवेश वाटप योजनेला विरोध केला आहे. शाळा व्यवस्थापन समित्यांनी याबाबत ठराव करून गणवेश स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने विद्यार्थ्यांना फूल शर्ट, फूल पॅन्ट उपलब्ध करण्यात यावे."

- साजिद अहमद,संस्थापक उर्दू शिक्षक संघटना

"गेल्या अनेक वर्षांपासून गणवेशाचे दोन संच पुरवण्यासाठी प्रति गणवेश ३०० रुपये शासनाकडून शाळा व्यवस्थापन समितीस दिले जात होते. त्यानुसार नियमित गणवेश वाटप होत होते. हे काम व्यवस्थित सुरू असतानाच यंदा बदल करण्यात आला. हा बदल अनाकलनीय असून त्यातही होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थ्यांसह पालकांकडूनही नाराजीचा सूर असल्याने शासनाने कापड वाटप योजना बंद करावी."- मनींद्र सावंत, ग्रामपंचायत सदस्य नामपूर

Sajid Ahmed giving a statement to Education Minister Deepak Kesarkar demanding uniforms for students in Urdu schools as before.
Malegaon MSRTC Depot : उत्पन्नावर आघाडीवर असूनही मालेगाव आगाराला समस्यांचा विळखा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.