Nashik MVP Marathon : मविप्र संस्थेतर्फे आठव्या राष्ट्रीय व तेराव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रविवारी (ता. २८) केले आहे. आशियायी हॉकी सुवर्णपदक विजेते ‘चक दे इंडिया’ फेम मिर रंजन नेगी यांची प्रमुख उपस्थिती असेल.
नाशिककरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मविप्रचे सरचिटणीस व मॅरेथॉनच्या आयोजन समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांनी केले. (Nashik MVP Marathon on Sunday nashik news)
संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पत्रकार परीषदेप्रसंगी संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, संचालक रमेश आबा पिंगळे, डॉ. प्रसाद सोनवणे, नंदकुमार बनकर, विजय पगार, सेवक संचालक डॉ. संजय शिंदे, सी. डी. शिंदे उपस्थित होते.
ॲड. ठाकरे म्हणाले, रविवारी (ता. २८) सकाळी पावणेसहाला मविप्र मॅरेथॉन चौक येथून पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेला सुरवात होईल. यानंतर टप्याटप्याने विविध गटांच्या धावण्याच्या शर्यती पार पडतील. सकाळी अकराला रावसाहेब थोरात सभागृहात पारितोषिक वितरण समारंभ पार पडेल.
संस्थेचे सभापती व मॅरेथॉन स्पर्धेच्या संयोजन समितीचे उपाध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी स्पर्धेसाठी वेगवेगळ्या राज्यातून झालेली नोंदणी तसेच धावनमार्ग आणि स्पर्धा बक्षिसांसंदर्भात माहिती दिली.
मॅरेथॉनचा मार्ग असा-
मविप्र मॅरेथॉन चौक येथून सुरू स्पर्धेला सुरवात होऊन धोंडेगावपर्यंत जाऊन पुन्हा मॅरेथॉन चौक असा स्पर्धेचा मार्ग असेल. स्पर्धेसाठी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटीक्स मॅरेथॉन आणि रोड रेसेसच्या तांत्रिक नियमानुसार स्पर्धेचे अंतर कॅलीब्रेटेड बायसिकलचा वापर करून निश्चित केले आहे.
आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन नियमाप्रमाणे पूर्ण मॅरेथॉनसाठी आठ रिफ्रेशमेंट पॉइंट उभारले जाणार आहेत. या ठिकाणांवर इलेक्ट्रॉल पावडर, मिनरल वॉटर, लिंबू पाणी, ऑरेंज ज्यूस, मीठ पाणी अशा रिफ्रेशमेंटची व्यवस्था असेल.
तसेच ७ स्पंजिंग पॉइंटची व्यवस्था केलेली आहे. याशिवाय पाच रुग्णवाहिका, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम व चाळी खाटांचे रुग्णालय आरोग्यसेवेसाठी तैनात असेल. फिजिओथेरपी महाविद्यालयातील डॉक्टरदेखील उपलब्ध असतील.
असे आहेत गट-
खुल्या राष्ट्रीय पुरुष गटासाठी ४२ किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन, २१ किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन असेल. महिलांसाठी दहा किलोमीटर अंतराची शर्यत असेल. १७ वर्षाआतील मुले (५ किलोमीटर) व मुली (४ किलोमीटर), १९ वर्षाआतील मुले (१० किलोमीटर) व मुली (५ किलोमीटर) ,२५ वर्षाआतील मुले (१२ किलोमीटर), मुली (६ किलोमीटर), ३५ वर्षावरील महिला (५ किलोमीटर), ज्येष्ठ नागरिक पुरुषांसाठी (०४ किलोमीटर) अंतराचा स्वतंत्र गट असेल.
नाशिक मविप्र मॅरेथॉनमध्ये असेल-
- सात लाख १६ हजारांचे एकूण पारितोषिके
- स्पर्धेत एकूण १४ गटांचा समावेश.
- पूर्ण मॅरेथॉनसाठी चाळीस, अर्धसाठी शंभर धावपटूंचा सहभाग
- सेनादल, पोलिस दलातील धावपटूंमध्ये राहील आव्हान
- नोंदणीत शाळकरी विद्यार्थ्यांना सवलत
- नोंदणीकृत धावपटूंना आकर्षक टी-शर्ट भेट
- बाहेर गावच्या विद्यार्थ्यांची राहाणे, जेवण्याची मोफत सुविधा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.