Nashik Onion : कांद्याचे दर ठरविण्याचे अधिकार ‘नाफेड’ला बहाल; राज्यात 3 हजार रुपयांपेक्षा कमी दर दिल्याने शेतकरी नाराज

Nashik Onion : कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने ‘नाफेड’चे गोठवलेले अधिकार पुन्हा स्थानिक स्तरावर बहाल केले आहेत.
Nashik Onion
Nashik Onionesakal
Updated on

Nashik Onion : कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने ‘नाफेड’चे गोठवलेले अधिकार पुन्हा स्थानिक स्तरावर बहाल केले आहेत. पहिल्याच दिवशी ‘नाफेड’ने राज्यात तीन हजार रुपये क्विंटलपेक्षा कमी दर दिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तीन हजार रुपये क्विंटल भाव मिळत असताना ‘नाफेड’ने त्यापेक्षा कमी दर जाहीर केल्याने शेतकरी संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत. (NAFED has been given right to decide price of onion in state )

केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेंतर्गत यंदा राज्यातून पाच लाख टन कांद्याची खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला. प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीनंतर ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ने कांदा खरेदी सुरू केली. उन्हाळ कांद्याला बाजार समितीत दोन हजार ८०० ते तीन हजार रुपये क्विंटल भाव मिळत असताना ‘नाफेड’ने दोन ते अडीच हजार रुपये दर जाहीर केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्रांकडे अक्षरश: पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले.

देशात सत्तांतर झाले आणि दिल्लीतील ग्राहक व्यवहार मंत्रालयाने ‘नाफेड’च्या अधिकारांवर गदा आणली. प्रत्येक आठवड्याचे दर मंत्रालयातून जाहीर करण्याचा नवीन निर्णय या वर्षी घेण्यात आला. परंतु, दिल्लीतूनही ठरलेले कांदा खरेदीचे दर बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कांद्याच्या दरापेक्षा कमीच असल्याने शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला. (latest marathi news)

Nashik Onion
Nashik Onion Export : निर्यातबंदी उठविल्यानंतर क्विंटलमागे 600 रुपयांची घसरण

या निर्णयामुळे शेतकऱ्यांची नाराजी वाढत असल्याचे लक्षात येताच केंद्र सरकारने पुन्हा कांदा खरेदीचे अधिकार २० जून २०२४ पासून ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ला बहाल केले. त्यानुसार पहिल्या दिवशी ‘नाफेड’ने राज्यातील विविध शहरांसाठी कांदा खरेदीचे दर तीन हजार रुपयांपेक्षा कमी ठेवला. परिणामी शेतकऱ्यांनी पुन्हा ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. दर ठरविण्याचे अधिकार बहाल करुरूनही काहीच फायदा झाला नाही, असे यातून स्पष्ट झाले आहे.

'‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’साठी कांदा खरेदी करणाऱ्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना शेतकऱ्यांनी आपला कांदा देऊ नये, असे आवाहन आम्ही केले आहे. बाजार समित्यांमध्ये तीन हजार रुपयांपर्यंत दर मिळत असताना ‘नाफेड’ने इतका कमी दर का ठरवला, याविषयी शंका वाटते. त्यांनी किमान साडेतीन ते चार हजार रुपये दर द्यायला हवा होता.''-भारत दिघोळे, अध्यक्ष, कांदा उत्पादक शेतकरी संघटना

Nashik Onion
Nashik Onion News : कांदा निर्यातबंदी शेतकऱ्यांसाठी देखावाच; घसरण सुरूच असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

‘नाफेड’ने ठरवरलेले दर (प्रतिक्विंटल)

अहमदनगर- २३५७ रु.

बीड- २३५७ रु.

नाशिक- २८९३ रु.

धुळे- २६१० रु.

छत्रपती संभाजीनगर- २४६७ रु.

धाराशिव- २८०० रु.

सोलापूर- २९८७ रु.

पुणे- २७६९ रु.

Nashik Onion
Nashik Onion News : निवडणुकीनंतरही कांदा दर जैसे थे; चाळीतच कांदा सडू लागल्याने शेतकरी अस्वस्थ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.