Nashik News : नामनिर्देश दाखल करण्याची आज अखेरची संधी! नाईक शिक्षण संस्‍था निवडणूक

Nashik News : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी (ता. ८) आणखी ९६ नामनिर्देश दाखल करण्यात आले.
Naik Education Institute Election
Naik Education Institute Election esakal
Updated on

Nashik News : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी (ता. ८) आणखी ९६ नामनिर्देश दाखल करण्यात आले. यातून आत्तापर्यंत दाखल नामनिर्देशपत्रांची संख्या २९६ झाली आहे. मंगळवारी (ता. ९) दुपारी चारपर्यंत नामनिर्देश दाखल करण्याची अखेरची संधी असणार आहे. (Naik Education Institute Election Today is last chance to file nomination)

जिल्ह्यातील प्रमुख शैक्षणिक संस्‍थांपैकी एक असलेल्‍या क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्‍थेच्‍या निवडणुकीत चुरस बघायला मिळणार आहे. इच्‍छुकांकडून सद्यःस्‍थितीत विविध पदांसाठी अर्ज दाखल केले जात असले तरी ते नेमके कुठल्‍या पदासाठी निवडणूक रिंगणात उतरणार, याबाबत माघारीनंतर चित्र स्‍पष्ट होऊ शकणार आहे.

यापूर्वी रविवारी (ता. ७) अनेक मातब्‍बरांनी ‘७-७’ चा मुहूर्त साधताना आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सोमवारी (ता. ८) देखील इच्‍छुकांचा ओघ सुरू राहिला. यातून दिवसभरात ९६ नामनिर्देशपत्र दाखल झाले. दाखल केलेल्‍या उमेदवारांमध्ये राज्‍य शासनाच्‍या माहिती व जनसंपर्क विभागाचे माजी संचालक शिवाजी मानकर यांचाही समावेश आहे.

याशिवाय दिगंबर गिते, ॲड. तानाजी जायभावे, कमलेश बोडके यांनीही विविध पदांसाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत. नियोजित निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवारी (ता. ९) दुपारी चारपर्यंत नामनिर्देश अर्ज विक्री व स्‍वीकृतीची मुदत असून, इच्‍छुक उमेदवारांना ही अंतिम संधी असणार आहे. (latest marathi news)

Naik Education Institute Election
Nashik Railway : सलग दुसऱ्या दिवशी ‘पंचवटी’सह अनेक गाड्या रद्द! नाशिकच्या प्रवाशांचे हाल

५०९ अर्जांची विक्री

दिवसभरात ८३ अर्जांची विक्री झाली असून, आत्तापर्यंत विक्री झालेल्‍या अर्जांची संख्या ५०९ झाली आहे. तुलनेत २९६ अर्ज दाखल झालेले असल्‍याने शेवटच्‍या दिवशी दाखल अर्जांची संख्या विक्रमी राहाण्याची चिन्‍हे आहेत.

सोमवारी (ता. ८) कार्यकारिणी सदस्‍यपदासाठी तालुकानिहाय दाखल अर्ज संख्या अशी

नाशिक- ११, दिंडोरी- चार, निफाड- १२, सिन्नर- आठ, नांदगाव- आठ, येवला- सहा अर्ज दाखल झाले आहेत.

सोमवारी (ता. ८) पदनिहाय नामनिर्देश दाखल उमेदवार असे-

- अध्यक्षपदासाठी- ॲड. तानाजी जायभावे. बाळासाहेब वाघ, रविकिरण डोमाडे, दिगंबर गिते

- उपाध्यक्षपदासाठी- कमलेश बोडके, बाळासाहेब वाघ, दिगंबर गिते, जयसिंह सांगळे

- सहचिटणीसपदासाठी- कमलेश बोडके, बाळासाहेब वाघ, अरुण घुगे, शिवाजीराव मानकर, भास्‍कर सोनवणे, जयसिंह सांगळे, दिगंबर गिते

- सरचिटणीसपदासाठी- ॲड. तानाजी जायभावे, दिगंबर गिते, संदीप फड, शिवाजीराव मानकर, संजय आव्‍हाड, वसंत वाघ

- महिला राखीव- मंगला गंभिरे, अलका सानप, रेखा कातकाडे, मीराबाई कातकाडे

Naik Education Institute Election
Nashik News : आयुक्तालयातील प्रभारींवर ‘खांदेपालटा’ची टांगती तलवार; सहायक आयुक्तांमध्ये फेरबदलाची चर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.