V. N. Naik Institution Election : नातं सांभाळायचं की पॅनल चालवायचं!

Nashik News : नाईक शिक्षण संस्‍थेच्या निवडणुकीत यंदाची निवडणूक खऱ्या अर्थाने रंगतदार ठरणार आहे. चार पॅनल निवडणूक रिंगणात असताना, प्रतिस्‍पर्धी पॅनलमधील उमेदवार एकमेकांचे नातेवाईक आहेत.
V. N. Naik Institution
V. N. Naik Institutionesakal
Updated on

Nashik News : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्‍थेच्या निवडणुकीत यंदाची निवडणूक खऱ्या अर्थाने रंगतदार ठरणार आहे. चार पॅनल निवडणूक रिंगणात असताना, प्रतिस्‍पर्धी पॅनलमधील उमेदवार एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्‍यामुळे नाते सांभाळताना नातेवाइकांना मतदान करायचे की नातेगोते बाजूला ठेवत संपूर्ण पॅनल चालवायचे, असा यक्ष प्रश्‍न सभासदांसमोर असणार आहे. (Naik education Institution Election)

चारही पॅनलच्‍या प्रमुखांनी प्राचाराचा नारळ वाढविला असून, सभासदांच्‍या भेटी, बैठकांचा जोर वाढला आहे. या निवडणुकीतील उमेदवार एकमेकांशी विभिन्न नात्‍यांमध्ये जोडले गेले असल्‍याने रंगत आणखीच वाढणार आहे. उमेदवारांच्‍या परस्‍परांमधील नात्‍यांवर प्रकाश टाकायचा झाल्‍यास, प्रगती पॅनलचे उमेदवार हेमंत धात्रक यांचे भाचेजावई मनोज बुरकुले नवऊर्जा पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार असून.

ते परिवर्तन पॅनलमधील उमेदवार ॲड. जयंत सानप यांचे मामेभाऊ आहेत. मोरवाडी गावातील ॲड. तानाजी जायभावे व ॲड. लक्ष्मण जायभावे हेदेखील परस्‍पर विरोधी पॅनलमध्ये आहेत. प्रगती पॅनलमधील रमेश घुगे यांचे चुलत चुलते पुतणे उदय घुगे हे परिवर्तन पॅनलमधून उमेदवारी करत आहेत. ‘परिवर्तन’चे डॉ. धर्माजी बोडके यांचे भाचे सोमनाथ गंभिरे प्रगती पॅनलमधून निवडणूक लढवत असून, श्री. गंभिरे यांचे साडू रमेश वाघ याच पॅनलमध्ये आहेत.

प्रगतीचे माणिकराव सोनवणे यांचे मामेभाऊ परिवर्तनचे ॲड. जयंत सानप आहेत. तर सोनवणेंचे मावस भाऊ मनोज बुरकुले आहेत. सुरेश घुगे व रंजना सांगळे हेदेखील एकमेकांचे नात्‍यागोत्‍यातील आहेत. नमूद नातेवाइकांचा उल्‍लेख बातमीत असला तरी आणखी काही उमेदवार एकमेकांच्‍या नात्‍यागोत्‍यातील असण्याची दाट शक्‍यता आहे. (latest marathi news)

V. N. Naik Institution
Nashik Sports Complex : क्रीडा संकुलातील ‘खो-खो’चा फलक फाडला! क्रीडा संघटनेकडून निषेध

सख्खे व्‍याही समोरासमोर

व्‍याहीचं नातं अतिशय मानापानाचे समजले जाते. पण यंदाच्‍या निवडणुकीत सख्खे व्‍याही समोरासमोर असल्‍याने काही वेळ मानपान बाजूला ठेवत पॅनलसाठी झोकून द्यावे लागणार आहे. थोरेंच्‍या पॅनलमधील उमेदवार विलास आव्‍हाड व धात्रक यांच्‍या पॅनलमधील बंडूनाना दराडे हे सख्खे व्‍याही एकमेकांसमोर आहेत.

गाव एक-उमेदवार अनेक

नात्‍यागोत्‍यांप्रमाणे गावातून उमेदवार देण्याची परंपरादेखील खंडित झाली आहे. बापू दरगोडे व राजेश दरगोडे असे दरगोडे परिवारातील दोन उमेदवार परस्‍पर विरोधी पॅनलमध्ये प्रतिनिधित्व करत आहेत. तर शिंगवेमध्ये भगीरथ गिते व दिगंबर गिते असे दोन उमेदवार आहे. शिवरे गावातून यापूर्वी कराड विरुद्ध सानप अशी लढत बघायला मिळायची.

V. N. Naik Institution
Nashik Monsoon Update : जिल्ह्यात सरासरी 13 मिलिमीटर पाऊस!

परंतु यंदा कराडांनी विश्रांती घेतली असून, सानप परिवारातील तीन उमेदवार निवडणूक रिंगणात एकमेकांना करडी टक्‍कर देणार आहेत. रामनाथ पंढरीनाथ सानप, रामनाथ भाऊराव सानप आणि बबनराव सानप लढत देतील. पूर्वी मखमलाबाद गावातूनही एखादा उमेदवार राहायचा; पण या वेळी नारायण काकड, प्रल्‍हाद काकड, गोकुळ काकड, ताडगे परिवारातील दोघे, असे एकूण पाच ते सहा उमेदवार मखमलाबाद गावातील आहेत.

"निवडणूक काही कालावधीची आहे; पण नातेसंबंध कायमस्वरूपी आहेत. त्‍यामुळे उमेदवारांवर कुठल्‍याही पातळीवर दडपण आणले जायला नको. त्‍यांना त्‍यांच्‍या सद्‍सदविवेकबुद्धीने काम करण्याची मुभा द्यावी. तसेच सर्व पॅनलच्‍या उमेदवारांनी कुठल्‍याही नातेवाईकाविषयी किंवा संस्‍थेच्‍या सेवकांविषयी मनात राग बाळगायला नको व समाजात ऐकोपा कायम राखावा, हीच अपेक्षा आहे." - एक सभासद, नाईक शिक्षण संस्‍था

V. N. Naik Institution
Nashik ZP News : सुपर फिफ्टीच्या निधीसाठी ‘नियोजन’ला साकडे; जिल्हा परिषद प्रशासनाकडून 2 कोटींची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com