Nashik Unseasonal Rain News : अवकाळी, वादळी पावसाने मोसम खोऱ्यामध्ये मोठी हानी

Unseasonal Rain : मुसळधार पावसाने भाजीपाला, आंबे, उत्पादक शेतकऱ्यांची दैना केली. नामपूर-ताहाराबाद राज्यमार्गालगत अनेक झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीस अडथळा आला.
tree fell on the road at a dangerous turn due to heavy rains.
tree fell on the road at a dangerous turn due to heavy rains.esakal
Updated on

Nashik News : नामपूर, आसखेडा, ब्राह्मणपाडे, जायखेडा, परिसरासह मोसम खोऱ्यात गुरुवारी (ता. ९) सायंकाळी चारच्या सुमारास वादळासह झालेल्या मुसळधार पावसाने भाजीपाला, आंबे, उत्पादक शेतकऱ्यांची दैना केली. नामपूर-ताहाराबाद राज्यमार्गालगत अनेक झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीस अडथळा आला. (unseasonal stormy rain caused damage)

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गावठी आंबे, हिरवी मिरची, टोमेटो, वेलवर्गीय भाजीपाला आदी पिके पावसाने बाधित झाली. दरम्यान कृषी व महसूल विभागाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मोसम खोऱ्यात सर्वत्र प्रचंड उष्मा जाणवत होता. गुरुवारी दुपारी अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाने हजेरी लावली. उन्हाच्या काहिलीतून दिलासा मिळाला असली तरी शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरला. कांदा भिजू नये यासाठी तो झाकण्याची शेतकऱ्यांची धावपळ सुरू होती.

काढलेला कांदा शेतातच असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पावसाने ओला झालेला कांदा आता विक्री व साठवण्यायोग्य राहिलेला नाही. सध्या बहरलेल्या आंब्याच्या झाडांना लगडलेल्या कैऱ्या वादळामुळे गळून पडल्या. भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज, काकडी या पिकांवरही अवकाळी पावसाचा विपरीत परिणाम होणार आहे. (latest marathi news)

tree fell on the road at a dangerous turn due to heavy rains.
Nashik News : खासदार संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात तक्रार

वादळामुळे विजेच्या ताराही रस्त्यावर लोंबकळत होत्या. परिसरातील ग्रामस्थ, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आदींनी तातडीने विजेच्या तारांची दुरुस्ती केली. अवकाळी पावसामुळे अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुतर्फा असणारी वाळलेली झाडे तोडावीत अशी मागणी मोसम प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

बंदिस्त शेडमध्ये लिलाव

नामपूर बाजार समितीमध्ये मजूर टंचाई, पावसाळी वातावरण आदी कारणामुळे कांद्याचे लिलाव रविवारपर्यंत बंद असल्याने मोसम खासगी मार्केटमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. गुरुवारी (ता.९) सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक पावसाला सुरवात झाल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. तेथील बंदिस्त शेडमध्ये लिलाव प्रक्रिया झाल्याने शेतकऱ्यांची सोय झाली.

tree fell on the road at a dangerous turn due to heavy rains.
Nashik News : वकिलांच्या रक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडू : डॉ. सुभाष भामरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.