SAKAL Exclusive : नामपूर पाणीपुरवठा योजनेला ठेकेदाराच्या दिरंगाईने ‘ग्रहण’

Nashik News : नामपूर व चारगाव नळपाणी पुरवठा योजनेला ठेकेदाराच्या दिरंगाईचे ग्रहण लागल्याने नामपूरसह पाच गावांमधील नागरिकांचा घसा अद्यापही कोरडाच आहे.
Work in progress of filter plant. The second photo shows the construction of a new water tank at Adarsh ​​Chowk.
Work in progress of filter plant. The second photo shows the construction of a new water tank at Adarsh ​​Chowk.esakal
Updated on

नामपूर : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता गेल्या तीन वर्षांपासून श्रीगणेशा झालेले हरणबारी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे नामपूर व चारगाव नळपाणी पुरवठा योजनेला ठेकेदाराच्या दिरंगाईचे ग्रहण लागल्याने नामपूरसह पाच गावांमधील नागरिकांचा घसा अद्यापही कोरडाच आहे. कार्यकारी, नामधारी ठेकेदारांच्या अक्षम्य दिरंगाईमुळे पाणी योजनेचे काम कूर्मगतीने सुरू आहे. (Nampur water supply scheme delay causes of contractor)

विशेष म्हणजे हरणबारी धरणातील विहीर, फिल्टर प्लांट, शहरांतर्गत असणारी पाईपलाईन, पाण्याच्या टाकीचे वॉटर प्रुफिंग, रंगकाम, व्हॉल्व्ह आदी प्रमुख कामे अपूर्णावस्थेत असताना लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी लोकप्रतिनिधींनी जलपूजनाचा केलेला अट्टाहास अंगाशी आला आहे. एप्रिल महिन्यात नामपूरचे ग्रामपंचायत सदस्य मनिंद्र सावंत.

मोसम प्रतिष्ठानचे गणेश खरोटे यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारून पाणीपुरवठा योजनेच्या दिरंगाईबाबत मालेगाव येथील जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता ए. एम. चव्हाण यांना योजनेच्या दिरंगाईबाबत जाब विचारला होता. सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने आग ओकणाऱ्या सूर्यामुळे भूजल पातळीत कमालीची घट झाली आहे.

त्यामुळे सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. शहरातील नागरिकांना पाच-सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. माजी सरपंच प्रमोद सावंत यांनी शहराची तहान भागविण्यासाठी आपल्या पिकांचे पाणी सोडून ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीस पाणी उपलब्ध करून दिल्याने टंचाईची धग कमी झाली आहे. (latest marathi news)

Work in progress of filter plant. The second photo shows the construction of a new water tank at Adarsh ​​Chowk.
Nashik News : कोट्यवधींचे बसस्थानक धूळखात; बस येत नसल्याने प्रवाशांचे हाल

पिण्याचे पाणी बहुतांश नागरिक विकतच घेत असल्याने जारद्वारे पाणीविक्रीचा व्यवसाय वाढला आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकामी लक्ष घालून शहराचा पाणीप्रश्‍न कायमचा निकाली काढण्यासाठी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत हरणबारी धरणातून थेट पाणी पुरवठा योजना तातडीने कार्यान्वित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत सुमारे ३३ कोटी रूपयांची नामपूर व चार गाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू असले तरी नागरिकांना शुद्ध पाणी कधी मिळणार, हा प्रश्‍न अद्यापही अनुत्तरीत आहे. सदर योजनेत लोखंडी पाईपलाईनचा पुरवठा शासनाकडून झाला आहे.

२५ मार्च २०२१ रोजी जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुबोध मोरे यांनी योजनेचे कार्यारंभ आदेश दिले आहेत. नाशिक येथील पी. पी. गोगड ठेकेदाराने १७ कोटी १० लाख ४० हजार ४१७ रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे टेंडर अंदाजित किमतीपेक्षा १३ टक्के कमी दराची निविदा भरल्याने १४ कोटी ८७ लाख ५३ हजार ८५१ रुपयांना पाणीपुरवठा कामाचा ठेका त्यांना मिळाला आहे.

Work in progress of filter plant. The second photo shows the construction of a new water tank at Adarsh ​​Chowk.
Nashik News : शिक्षकांची फरक बिले सेवाज्येष्ठतेने द्यावीत

तीन वर्षानंतरही पाणी पोहचलेच नाही

पाणीपुरवठा योजनेचे बांधकाम दोन वर्षात होणे गरजेचे होते. त्यानंतर एक वर्ष योजना चालवण्याची जबाबदारीही ठेकेदारावर शासनाने निश्‍चित केली आहे. गोगड यांनी प्रत्यक्ष कामासाठी उपठेकेदाराची निवड केली असून, पाणीयोजनेच्या कामात दिरंगाई झाल्याने संबंधित ठेकेदारास प्रतिदिन दंडही ठोठावला आहे. त्यामुळे सदर योजनेचे काम कधी पूर्ण होणार याबाबत अंदाज बांधणे कठीण झाले आहे.

नामपूरसह आसखेडा, जायखेडा, नळकस व सारदे या पाच गावांना योजनेचा लाभ होणार आहे. सदर योजनेंतर्गत हरणबारी धरणातून थेट पाईपलाइनद्वारे शहरासाठी तसेच सहभागी गावांसाठी मुबलक प्रमाणात शुद्ध पाणी उपलब्ध होईल, असा गाजावाजा करण्यात आला. परंतु, त्यानंतर तीन वर्षांचा कालावधी लोटल्यावरही अद्याप कोणत्याही गावात पाणी पोहोचले नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

"जलजीवन मिशन योजनेंतर्गत सुमारे ३३ कोटी रुपयांच्या विनियोगातून नामपूर व चारगाव पाणीपुरवठा योजनेच्या कामात संबंधित ठेकेदाराकडून दिरंगाई झाल्याने शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरांतर्गत सुमारे चाळीस किलोमीटरची पाईपलाईनच्या कामास नुकतीच सुरुवात झाली आहे. हरणबारी धरणात जलसाठा अत्यल्प असल्याने धरणातील विहिरीचे काम ठेकेदाराने तातडीने मार्गी लावावे." - मनींद्र सावंत, ग्रामपंचायत सदस्य, नामपूर

Work in progress of filter plant. The second photo shows the construction of a new water tank at Adarsh ​​Chowk.
Nashik ZP News : जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कायापालट; जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून 50 रुग्णालयांसाठी 2 कोटींची तरतूद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.